Beach Memories: शंख शिंपल्यांमधले बालपण

शिंपले मृत असले तरी ते पर्यावरणात महत्‍वाची भूमिका बजावत असतात. काही तज्ज्ञांच्या मते, किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी ह्या शिंपल्यांची मदत होत असते.
Conch Mussels
Conch MusselsDainik Gomantak
Published on
Updated on

छायाचित्र : संदीप देसाई

ज्यांना समुद्राच्या पाण्यात जाऊन मौजमस्ती करायची असते त्यांना समुद्र अगत्याने अवश्य तसे करू देतो पण ज्यांना फक्त किनाऱ्यावर बसूनच समुद्राचा आनंद घ्यायचा असतो त्यांच्यासमोर तो शंखशिंपल्याची रासही आणून ओततो.

लांबलचक शुभ्र किनारा अंगाला लाभल्यामुळे गोव्यातील अनेकांनी आपल्या बालपणी किनाऱ्यावरचे शंख शिंपले वेचले नाहीत असे अपवादानेच घडलेले असेल. शिंपल्याच्या राशीत वेगळ्या आकाराचा, वेगळ्या रंगाचा शिंपला दिसल्याबरोबर मुल्यवान मोती सापडल्यासारखा आपल्या बालमनाने केलेला जल्लोष स्मृतीच्या कोपऱ्यातून अनेकांना खुणावत असेल.

Conch Mussels
Rakhi For Soldier: एक राखी जवानांसाठी!

पण मोठे होत जाताजाता तसा जल्लोष करण्याची प्रेरणा आपल्यातून कुणीतरी लुप्त करायला लागतो तेव्हा ‘संपले बालपण सारे’ हे कुणी न सांगताच आपल्या आपण ओळखतो आणि मग आकर्षक शिंपला पायाखाली आला तरी तो हृदयात उतरत नाही.

बांबोळी येथील किनाऱ्यावर जमा झालेली शिंपल्याची ही रास हेच सांगते की तुमचे बालपण तपासून पाहण्यासाठी समुद्र आपली खेळी अजूनही खेळतो आहे.

शंख शिंपल्याची खेळणी किनाऱ्यावर रचून, आमच्या वाढलेल्या वयाला ओशाळे करत तो आपल्या परीने निमंत्रण देत राहतो. शंख-शिंपले दिसले की आश्‍चर्य-आनंदाने केलेले बालपणीचे चित्कार भासात देखील अलिकडे उमटत नाहीत हे समुद्राला कसे कळावे?

Conch Mussels
डिचोलीतील ‘कराओके’ वरील ‘उडान’ एकदम 'ओके'; मुलांच्या अविष्काराने उपस्थित भारावले

समुद्रात असताना शिंपला आणि त्याच्यामधील इवल्या जीवाचे नाते अतुट असते. जेव्हा शिंपल्याच्या कवचाचे नुकसान होते, ते मोडते-तुटते तेव्हा आतला जीव प्रथिने, कॅल्शियम कार्बोनेट तयार करून त्या तुटलेल्या भागाची दुरुस्ती करून शिंपल्याबरोबरची आपली साथ अभंग ठेवतो.

पण जेव्हा तो आतला जीव मरून जातो तेव्हा त्याचे नाजूक शरीर समुद्रात नाहीसे होते आणि कवच तेवढे शिल्लक राहते. समुद्राचा प्रवाह कधीतरी मग त्या कवचाला किनाऱ्यावर घेऊन येतो. समुद्र किनाऱ्यावर आलेले हे रिकामे शिंपले शेकडो वर्षे- कदाचित हजारो वर्षे जुने असू शकतात.

शिंपले मृत असले तरी ते पर्यावरणात महत्‍वाची भूमिका बजावत असतात. काही तज्ज्ञांच्या मते, किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी ह्या शिंपल्यांची मदत होत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com