Freedom Fighter of Goa Liberation: श्रीधर महादेव जोशी; एक अष्टपैलू व्यक्तित्व

श्रीधर महादेव जोशी हे स्वातंत्र्य सेनानी, लेखक, संपादक व लोकांसाठी झटणारे व्यक्तिमत्व होते.
Shreedhar Mahadev JoshiGoa Liberation Struggle

Shreedhar Mahadev Joshi

Goa Liberation Struggle

Dainik Gomantak

प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर 1947 साली भारताला (India) ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. मात्र, देशाच्या पश्चिम किनार पट्टीला लागून असलेला गोवा (Goa) अजूनही पोर्तुगीजांच्या (Portuguese) तावडीत अडकून होता. पोर्तुगीज हुकूमशहा सालाझार कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत न्हवता. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अनेकवेळा त्याला गोवा सोडण्याची विनंती केली. मात्र, या विनंतीचा सालाझारवर काहीही परिणाम झाला नाही.

Shreedhar Mahadev Joshi

Goa Liberation Struggle

नोकऱ्यांची विक्री : यात नवल ते काय?

गोवा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो पोर्तुगीजांच्या गुलामीतून मुक्त झाला पाहिजे, या भावनेने अनेक स्वातंत्र्यवीर व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन गोवा मुक्ती संग्राम (Goa Liberation Struggle) केला. या संघर्षात श्रीधर महादेव जोशी (Shridhar Mahadev Joshi) यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. एक साधे, प्रामाणिक व तळमळीचे कार्यकर्ते म्हणून जोशी प्रसिद्ध असून अन्यायांविरुद्ध परखडपणे लढा देण्यात ते अग्रेसर राहिले. त्यांच्यावर दोन गौरवग्रंथ प्रसिद्ध झाले असून त्यांची व्याख्याने, पत्रे व इतर लेख एस्. एम्. जोशी : व्यक्ति, वाणी, लेखणी या नावाने प्रसिद्ध झाले आहेत.

श्रीधर महादेव जोशी हे 'एसएम’ जोशी या नावाने परिचित आहेत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी होते. एक निष्ठावंत नेता व स्वातंत्र्यवीर अशी त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म जुन्नर येथे मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. जोशी चिकाटीने अभ्यास करून एल्एल्.बी. झाले. महात्मा गांधी व त्यांच्या कार्याने जोशींना आकर्षित केले. ते मिठाचा सत्याग्रहात सहभागी झाले, म्हणून त्यांना अटक होऊन शिक्षाही झाली. पुढे मानवेंद्रनाथ रॉय यांना मुक्त करावे, या त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.

Shreedhar Mahadev Joshi

Goa Liberation Struggle

अनेक कलांचा संगम साधणारी माशेलची महाशाला

एसएम जोशी हे उत्तम नेते देखील होते. त्यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने काँग्रेस सोशॅलिस्ट पक्ष स्थापन केला. त्यांनी अनेक मोर्चे व आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यांनी 1937 साली शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. राष्ट्र सेवा दलाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. त्याचे ते 1940-41 आणि 1947-51 या कालावधीत दल प्रमुख होते. 1948 मध्ये ते महाराष्ट्राच्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यांनी 1950 मध्ये साने गुरूजी सेवापथकात भाग घेतला व साधना हे साप्ताहिक चालावे, म्हणून समिती स्थापन करून हे साप्ताहिक पुढे चालू ठेवले. पुढे ते 1943 ला मुंबई विधानसभेवर निवडून गेले.

स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या मुक्तते साथी लढलेले एसएम जोशी, स्वातंत्र्योत्तर काळात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवत राहिले. गोवा विमोचन समिती व संयुक्त महाराष्ट्राची (Maharashtra) चळवळ यात ते आघाडीवर होते. पुढे ते 1967 मध्ये लोकसभेवर (Loksabha) निवडून गेले. त्यांनी आपली मते 'डेली न्यूज' व 'लोकमित्र' या वृत्तपत्रांद्वारे मांडली. त्याचे ते अनुक्रमे 1953 व 1958-62 मध्ये संपादक होते. जोशींचा 'उर्मी' कथासंग्रह प्रसिद्ध आहे, ते आस्पेक्ट्स ऑफ सोशॅलिस्ट पॉलिसी या ग्रंथाचे ते लेखक आहेत.

जोशींनी 1939 मध्ये तारा पेंडसे यांच्याबरोबर विवाह (Marriage) केला. त्यांना 2 मुले आहेत. जोशींना साठाव्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या अनुयायांनी त्यांना एक लाख रुपयांची थैली दिली. हे पैसे स्वतःसाठी न वापरता त्याचा उपयोग कार्यकर्त्यांसाठी व्हावा, म्हणून त्यांनी सोशॅलिस्ट प्रतिष्ठानची स्थापना केली. अखेर 1 एप्रिल 1989 रोजी श्रीधर महादेव जोशी यांचे निधन झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com