Nature: ‘वृक्ष आणि निसर्गाशी बंध’, बाल - चित्रकारांच्या कलाकृती

‘काळजी’ या सेवाभावी संस्थेने १० ते १६ वर्षे वयाच्या मुलांसाठी राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.
Drawing
Drawing Dainik Gomantak
Published on
Updated on

Nature नागरीकांच्या स्वास्थ्यविषयक समस्या सोडवण्यासंबंधात आणि पर्यावरणविषयक कार्य करणाऱ्या ‘काळजी’ या सेवाभावी संस्थेने १० ते १६ वर्षे वयाच्या मुलांसाठी राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन हल्लीच केले होते.

‘वृक्ष आणि निसर्गाशी बंध’ (बॉंड वीथ ट्रीस ॲण्ड नॅचर) या विषयावर रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या स्पर्धेला देशभरातून बाल - चित्रकारांनी भरभरून प्रतिसाद दिला.

२७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात मुलांनी क्रॅयोन, पेन्सिल आणि डिजिटल साधनांच्या सहाय्याने झाडे आणि निसर्गाबरोबर असलेले त्यांचे नाते आपल्या कलाकृतींमध्ये प्रभावीपणे मांडले. त्यांची चित्रे त्यांच्या कल्पनाशक्तीची साक्ष यथार्थपणे देत होती.

हिरवीगार जंगले, मित्रभावाचे प्राणी, साहसी सफरी, कौटूंबिक सहली अशा मनात रुजून राहीलेल्या वेगवेगळ्या आठवणी त्यांनी चित्रातून साकार केल्या. त्यांची प्रत्येक कलाकृती निसर्गाशी, पर्यावरणाशी असलेला ह्रदयस्पर्शी मानवी संबंध व्यक्त करत होत्या.

ही स्पर्धा दोन श्रेणीमध्ये घेण्यात आली. पहिली श्रेणी अधिकाधिक ‘लाईक’ मिळवणे ही होती आणि दुसऱ्या श्रेणीतील चित्रे परिक्षकांनी निवडायची होती.

विजेत्यांची नावे

श्रेणी १ (अधिकाधिक लाईक)

प्रथम पारितोषिक : सान्वी गांवकर

द्वितीय पारितोषिक : श्लोक नाडकर्णी

तृतीय पारितोषिक : अश्मी प्रभुदेसाई

उत्तेजनार्थ : शिखा नाईक,

आरव देसाई

श्रेणी २ (परिक्षकांची निवड)

प्रथम : लैना फर्नांडिस

द्वितीय : तनिश्क खांडेपारकर

तृतीय : शाश्वत गुणागा

उत्तेजनार्थ : सर्वेश अलवाणी,

चेतन गावकर, साईशा फुलारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com