Goa Culture : पुनाव : शेकडो वर्षांची परंपरा

हा पुनाव उत्सव शनिवार २८ ऑक्टोबर रोजी येथील श्री भगवती मंदिर, श्री रवळनाथ मंदिर व देवाचा मांगर (आदिस्थान) अशा तीन मंदिरातून साजरा होतो.
Goa Culture
Goa CultureDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Culture : मंतकातील काही मोठ्या सण उत्सवांपैकी पेडणे येथील ‘पुनाव’ उत्सव हा एक. पुनाव म्हणजे पौर्णिमा. दसरा सण भारताच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तसा तो तेथे आपल्या परंपरेनुसार शेकडो वर्षे साजरा होत आला आहे.

हा पुनाव उत्सव शनिवार २८ ऑक्टोबर रोजी येथील श्री भगवती मंदिर, श्री रवळनाथ मंदिर व देवाचा मांगर (आदिस्थान) अशा तीन मंदिरातून साजरा होतो.

या उत्सवाची सुरवात विजयादशमीला घटस्थापनेने होते. घटस्थापना म्हणजे श्री भगवती देवीच्या उजव्या बाजूस मातीच्या कलशात पाणी, सुपारी, आंब्याचा टाळ व त्यावर श्रीफळ ठेवून मातीत ठेवतात. कलशाच्या खाली नऊ प्रकारची धान्ये टाकतात.

याला ‘रुजवण’ म्हणतात. या घटाजवळच महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांची विधिपूर्वक स्थापना केली जाते. नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक रात्री देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाते. पहिली पालखी देवस्थान समितीमार्फत व त्यानंतर विविध समाजातर्फे पालखी काढली जाते.

नवमीच्या दिवशी रवळनाथ मंदिरात देवाच्या डोक्यावरील मंडपावर एक तोरण, दुसरे उजव्या बाजूच्या खांबाला व तिसरे रवळनाथ मंदिराच्या दरवाजावर बांधतात. तोरण बांधण्याचा मान हा सुतार घराण्याला आहे. येथूनच ढोल - ताशांच्या आवाजात शेवटची पालखी काढली जाते. याला ढोलाची पालखी म्हणतात.

या पालखीचे सात मानकरी असतात. यापैकी नवमीच्या पालखीचा सन्मान देशप्रभू महाजन मानकऱ्याचा असतो त्याला नवमीची पालखी असे म्हणतात. नऊही रात्रीच्यावेळी श्रीभगवती मंदिरात भजन व कीर्तनाचे कार्यक्रम होतात.

Goa Culture
Goa GIDC: प्रदूषणाच्या अंगाने उद्योगांची तपासणी सुरू

यानंतर विजयादशमीला सकाळी श्री भगवतीला अभिषेक, आरती झाल्यावर गाऱ्हाणे घालतात. संध्याकाळी देवीला वस्त्रालंकारांनी सजवतात. नंतर भाविक व देवस्थानचे लोक सोने म्हणून आपट्याची पाने लुटून येतात.

ही पाने भाविक मंदिरातील तबकात टाकतात. या रात्री आदिस्थान येथे नवसाच्या वस्तू देवाला अर्पण करतात. त्याला ‘चिरे’ म्हणतात. चिरे म्हणजे नऊवारी लुगडी.

घटस्थापनेच्या दिवशी या मंदिरातील रुजवण वाटण्यात येते व गाऱ्हाणे होते. नंतर रवळनाथाच्या मंदिरात रवळनाथाला २०, तर भूतनाथाला २१ मिऱ्या काढलेल्या साड्यांनी तरंगांना सजवतात. पहाटे चार वाजेपर्यंत तरंगे सुरू असतो... ‘हर हर महादेव’च्या जयघोषात हे देव कर्पेचा पिंपळ येथे जातात.

तिथून ही दोन्ही तरंगे श्री भगवतीच्या मंदिराकडे येण्यास निघतात. श्री भगवती मंदिराच्या पटांगणासमोर मंगलाष्टका म्हणून सिमोलंघन कार्यक्रम होतो. दोन्ही तरंगे भगवतीच्या मंदिरात जातात. वाटेत “हर हर महादेव”चा जयघोष सुरूच असतो. एकादशी दिवशी रात्री देवाच्या मांगरात महानैवेद्य होतो.

Goa Culture
National Games Goa उद्घाटन कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या... व्हिडिओ व्हायरल Watch

त्याला “पावणेर” म्हणतात. नंतर येथे गाऱ्हाणे व देवाचा कौल होतो. त्यानंतर ही तरंगे श्रीभगवती मंदिरात जातात. तिथे भाविकांना कौल देण्याचा कार्यक्रम होतो.” “पुनाव” हा उत्सवाचा अंतिम भाग. गोव्याबरोबरच या देवांचे अनेक भाविक शेजारच्या राज्यात व संपूर्ण जगात विखरलेल्या पुनवेला आवर्जून देवदर्शनाला येतात.

या दिवशी सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी उसळते. भरलेल्या मोठ्या बाजारफेरीत लाखो रुपयांची उलाढाल होते. रात्री देवाचा मांगर येथे मनोरुग्णांवर उपचार होतात. स्थानिक लोक याला ‘भुते’ काढण्याचा कार्यक्रम असे संबोधतात.

नंतर दरवर्षीप्रमाणे श्री भूतनाथ आपणासाठी “एका रातीन आनी एका वातीन, माका देऊळ बांधून जाय” अशी मागणी करून रागाने रानाच्या दिशेने आपल्या तरंगासह जाण्याचा प्रयत्न करतो, पण महाजन व भाविक त्याची “बातूं देवा”

अशी मनधरणी करून मंदिर बांधण्याची जबाबदारीही भूतनाथावरच टाकून समजूत घालतात. भक्तांच्या विनंतीला मान देवून व आश्वासनावर विश्वास ठेवून भूतनाथ आपला मित्र रवळनाथबरोबर माघारी फिरल्यावर पहाटे या उत्सवाची सांगता होते.

- प्रकाश वि. तळवणेकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com