Food Blogger : फूड ब्लॉगर म्हणजे आवड आणि सातत्य

जरी ब्लॉगरला त्या कामासाठी मानधन दिले जात असले तरी लोकांचा विश्वास असतो की ब्लॉगर प्रमाणिकपणे आपले मत नोंदवत आहे.
Siya Shirwaikar, food blogger
Siya Shirwaikar, food bloggerDainik Gomantak
Published on
Updated on

फूड ब्लॉगर हा एक प्रकारे अन्नसंस्कृतीचा राजदूत असतो. आपोआपच तो त्या प्रदेशाचा चेहरा बनतो. आपले मार्केट विस्तारण्यासाठीही खाद्यपदार्थांशी संबंधित असलेली आस्थापने लोकप्रिय फूड ब्लॉगरची संपर्क साधतात. त्यांना ठाऊक असते की त्या ब्लॉगरने टाकलेली एक पोस्ट त्यांच्या उत्पादनाला हजारो लाखो लोकांपर्यंत नेणार आहे.

हे पारंपरिक जाहिरातींसारखे नसले तरी त्यात एक प्रकारचे समीक्षण असते. जरी ब्लॉगरला त्या कामासाठी मानधन दिले जात असले तरी लोकांचा विश्वास असतो की ब्लॉगर प्रमाणिकपणे आपले मत नोंदवत आहे. प्रामाणिक ब्लॉगरना आपोआप अधिकाधिक लोक फॉलो करतात.

जरी मी अनेक आस्थापनांबरोबर व्यावसायिकरित्या जुळले गेले असले तरी माझी लोकप्रियता ही मी स्थानिक खाद्यपदार्थांना प्रसिद्धी देत असल्यामुळे अधिक आहे. तसे पोस्ट टाकल्यानंतर एक-दोन दिवसांनी जेव्हा मला फोन येतो की मॅडम तुमच्या पोस्टमुळे माझ्या स्टॉल/रेस्टॉरंट वर गर्दी झालेली आहे, तेव्हा तो समाधानाचा क्षण असतो.

मी त्यांना किंवा ते मला ओळखत नसतात. स्थानिक खाद्यपदार्थांची ओळख इतरांना करून द्यावी हाच माझा प्रथमपासून उद्देश होता. माझी सुरुवातच तशी झाली आहे. आज जरी मी व्यावसायिक आस्थापनांकडे जुळले गेले असले तरी आठवड्यातून माझे किमान दोन पोस्ट स्थानिक खाद्यपदार्थांची प्रसिद्धी करणारे असतात.

Siya Shirwaikar, food blogger
Blog: ‘द ग्रेटेस्ट इंडियन स्टोरीज एव्हर टोल्ड’मध्‍ये गोमंतकीय लेखकांच्या कथा

सद्य घडीला माझे 1 लाख 35 हजार फॉलोवर्स आहेत. ते सारे विशिष्ट कारणामुळे मला फॉलो करतात असा माझा विश्वास आहे. त्यामुळे माझी ही जबाबदारी बनते की मी कधी खोटा रिव्ह्यू देऊ नये. जे खरे आहे तेच माझ्या पोस्टमधून मी मांडले पाहिजे.

माझे पोस्ट व्यावसायिक असले तरी केवळ त्या कारणामुळे माझ्याकडून चुकीच्या गोष्टीला प्रसिद्धी मिळू नये. तुम्ही जितके प्रामाणिक रिव्ह्यू द्याल तितकी तुमची वाढ होईल. जर तुम्ही सापळ्यात अडकलात तर मात्र तुम्हाला भविष्य असणार नाही.

फूड ब्लॉगर्स बनू पाहणाऱ्यांना मी सांगेन की सर्वप्रथम तुम्हाला त्याची आवड हवी आणि दुसरे म्हणजे तुमच्यात सातत्य हवे. या क्षेत्रात सातत्य खूप महत्त्वाचे आहे आणि अर्थातच तुमच्या प्रामाणिकपणा हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com