उत्क्रांतीचे झाड

बझ यांच्या मते, भारतातील विविध वंशांमधील जनुकांचा प्रवाह सुमारे ७० पिढ्यांपूर्वी म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या ते सहाव्या शतकात अचानक संपुष्टात आला.
goa
goaDainik Gomantak

तेनसिंग रोद्गीगिश

आफ्रिकन दुवे शोधण्यापूर्वी एक स्पष्टीकरण. होमो इरेक्टसची उत्क्रांती आफ्रिकेत झाली हे गृहीतक जर आपण मान्य केले तर आपल्या सर्वांचा एक आफ्रिकन दुवा आहे; म्हणून तो दुवा आपल्याला काहीच सांगत नाही.

होमो प्रजातीच्या काही व्यक्ती वेगवेगळ्या वेळी चांगल्या आहारासाठी आफ्रिका सोडून जाऊ शकल्या असत्या; तर काही मागे राहू शकल्या असत्या. जे मागे राहिले ते पुढे नव्या प्रजातीत विकसित झाले असते आणि नंतर आफ्रिका सोडून गेले असते. जे निघून गेले ते पुढे इतरत्र नवीन प्रजातीत विकसित होऊ शकले असते.

अशा वेळी प्रजातींमधील सीमा अस्पष्ट होतात; कारण वेगवेगळ्या प्रजातींनी आंतरप्रजनन केले आहे आणि परिणामी एक नवीन होमिनिन प्रजाती निर्माण झाली आहे असे दिसते . होमिनिन प्रजातींच्या सीमा ओलांडून आंतरप्रजनन करत असण्याची शक्यता शास्त्रज्ञ आता मान्य करतात; कारण उत्क्रांती ही पायरी नव्हती, तर ती हळूहळू बदलाची प्रक्रिया होती आणि नैसर्गिक निवडीद्वारे काही प्रजाती नष्ट झाल्या होत्या. ते हेदेखील मान्य करतात की नेहमीच एक प्रजाती विरुद्ध दुसरी प्रजाती नसते; हे द्वेष-प्रेम-उदासीनतेचे चक्र होते. त्यातून असंख्य शक्यता निर्माण होतात.

परंतु हे अधिक गुंतागुंतीचे आणि मनोरंजक होते म्हणजे नंतरच्या टप्प्यावर सुरू होणारे आंतरविवाह. ज्या प्रजातींच्या सीमा अस्पष्ट होत होत्या, त्या कालांतराने आंतरप्रजननावरील निर्बंधांमुळे दृढ होऊ लागल्या. यातील सर्वात नैसर्गिक म्हणजे महासागर, पर्वत, नद्या यांसारखे भौतिक अडथळे.

अलिप्त अडथळ्यांपैकी बेटं सर्वात मजबूत बनली. कालांतराने होमो सेपिअन्स होमो सोशलिसमध्ये विकसित होत गेले; तेव्हा सामाजिक अडथळे आले, आंतरविवाहयोग्य - होमो सेपिअन्सच्या एका गटातील व्यक्ती होमो सेपिअन्सच्या दुसर्‍या गटातील व्यक्तींशी आंतरप्रजनन करत नाहीत. बसू यांच्या मते, भारतातील विविध वंशांमधील जनुकांचा प्रवाह सुमारे ७० पिढ्यांपूर्वी म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या ते सहाव्या शतकात अचानक संपुष्टात आला.

विशेष म्हणजे हे अडथळे मुख्यत: वर वर्णन केलेल्या उत्क्रांतीच्या झाडावरील समूहाच्या स्थानावर आधारित आहेत; ज्याला आपण जातीयता म्हणतो. त्यातून लहान किंवा मोठी जनुकीय बेटं (जेनेटिक आयसोलेट्स) तयार झाली; आंतरविवाहाच्या भिंती उंचावल्या, समूहाचे वेगळेपण, ''वांशिकता'' अधिक चांगल्या प्रकारे जपली.

यालाच आपण समाज म्हटले आहे. या समाजाचा, त्याच्या वंशाचा उत्क्रांतीच्या झाडाशी जवळचा संबंध असल्याने त्या झाडावरील त्याचे स्थान त्याचे पूर्वज प्रकट करते. यावरच आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत; यालाच आपण ''आफ्रिकन लिंक'' असे संबोधले आहे; आपल्याला ज्या गोष्टीत रस आहे तो म्हणजे त्या दुव्याचे वय. लक्षात ठेवा, सध्या आपण या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहोत -विविध कोकणी समुदायांपैकी , या भूमीत प्रथम कोण स्थायिक झाले?

आपण मागच्या वेळी चर्चा केलेल्या तामीळींच्याबाबतीत या दृष्टिकोनाचा उपयोग स्पष्ट करूया . इ.स.पू. ४,००० ते २,००० च्या दरम्यान आफ्रिकेशी असलेल्या व्यापारी संबंधातून तामीळ समुदायाचा उदय झाला, तर हा समुदाय तुलनेने अलीकडचा आहे; क्षत्रिय इ.स.पू. ८,००० च्या आसपास आला; किरात इ.स.पू. ६,००० च्या आसपास; ब्राम्हण इ.स.पू. २,००० च्या आसपास आला. दुसरीकडे, तामीळींचा उगम वेल्सच्या मदुराई नमुन्यात शोधता आला तर हा समुदाय ४०,००० वर्षे जुना असू शकतो. पुढेही, जर या समुदायाचा उगम अत्तिरामपक्कम प्रकरणातून शोधला गेला, तर तो खूप जुना असू शकतो.

आता आपण आपल्या दुसर्‍या उदाहरणासाठी खऱ्या बेटाकडे वळतो - अंदमान बेटांचा समूह. अंदमान द्वीपसमूहाचे मूळ रहिवासी हे लहान उंचीच्या शिकारी-संग्राहकांच्या अनेक विभक्त गटांपैकी एक आहेत, ज्यांना कधीकधी नेग्रिटो म्हणून ओळखले जाते, जे आशियाच्या काही भागात; मलेशिया आणि फिलिपिन्ससारख्या काही द्वीपसमूहांवर टिकून आहेत.

जरी या लोकांना नेग्रिटोस म्हणतात आणि जरी ते आफ्रिकन पिग्मीची शारीरिक वैशिष्ट्ये सामायिक करतात - जसे की लहान उंची, गडद त्वचा, कुरळे केस, शरीराचे कमी केस आणि कधीकधी स्टीटोपिजिया (नितंबांवर मोठ्या प्रमाणात चरबी जमा होणे), बहुतेक अनुवांशिक अभ्यासांनी असा निष्कर्ष काढला आहे की 1)ते भारतीय मुख्य भूमीच्या लोकसंख्येपेक्षा आफ्रिकन पिग्मीशी अधिक संबंधित नाहीत; 2) दोघेही एकच मूळाचे असु शकतात 3) की ''पिग्मी इफेक्ट'' हा पूर्णपणे उष्णकटिबंधीय वर्षावन वातावरणाशी स्थानिक अनुकूलतेचा परिणाम आहे.

तथापि अलीकडील अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की दक्षिण आणि आग्नेय आशियाई लोकसंख्येसह अंदमानचा एक अज्ञात वंश आहे जो त्याला भारतीय मुख्य भूमीपासून वेगळे करतो; आणि हा वंश या लोकसंख्येपुरताच राहिला आहे. [बसू, २०१६ : १५९८] युरोपियन जनुकांमध्ये निअँडरथल मूलद्रव्य जसे असते तसे होमो सेपिअन्सपूर्व पूर्वजांकडून हे आले असावे . जर ते खरे असेल तर अंदमानची मुळे बरीच प्राचीन असू शकतात.

समुद्रात दूर असलेले एक भौतिक बेट अत्यंत एकटेपणा प्रदान करते. परंतु घनदाट जंगलांनी व्यापलेल्या सह्याद्रीच्या काही भागात जनुकीय बेटेही आढळतात.

यापैकी सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात संशोधन केलेले, नीलगिरी पर्वतरांगांमधील तोडा, बडुगा,कोट, कुरुबा आणि इरुला हे समुदाय आहेत; ते आपापसात संवाद साधत होते परंतु मैदानी लोकांपासून अलिप्त होते. या समुदायांच्या वंशाविषयीचे संशोधन तुलनेने जुने आहे; ब्रिक्स यांनी १८७३ मध्ये नीलगिरीच्या आदिम जमाती आणि स्मारकांचा लेखाजोखा लिहिला.

तरीही त्यांचे मूळ वादग्रस्त आहे. बडुगा म्हैसूरहून तर तोडा केरळमधून स्थलांतरित झाले असावेत, असे म्हटले जाते; असे अभ्यास आहेत की ते ''कानरा प्रदेशातून'' स्थलांतरित झाले असावेत.

आपल्याला हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की नीलगिरी म्हैसूर, केरळ आणि कानारा यांचा समावेश असलेल्या प्राचीन इकोझोनमध्ये आहे आणि या तिघांची समान संस्कृती आहे. या संदर्भात हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की बडुगाचा वडुकरांशी एक समान व्युत्पत्तिशास्त्रीय उगम आहे असे दिसते, हा शब्द तामीळीनी तामीकाम आणि आर्याच्या भूमीच्या दरम्यान असलेल्या प्रदेशातील रहिवाशांसाठी वापरला होता.

गोव्यातील सांगे, केपे आणि काणकोण तालुक्यांचा ''डोंगराळ आणि घनदाट जंगली'' भाग आणि उत्तर कन्नडमधील तिनई, सुपा, दीघी, उलवी, बारची, कुंभारवाडा आणि हल्याळ तालुक्यांच्या ''डोंगराळ आणि घनदाट जंगली'' भागात वास्तव्यास असणारा कुणबी समाज त्यांच्या अनुवांशिक बेट आहेत का? मिश्रणांद्वारे अनुवांशिक माहिती नष्ट होण्यापूर्वी आपल्याला त्याच्या पूर्वजांची तपासणी करणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com