Dabhol Bandar : दाभोळ-मध्ययुगीन प्रमुख बंदरे

Dabhol Bandar : कोकण किनारपट्टीवरील मुंबईच्या आग्नेय दिशेस सुमारे ८५ मैलावर दाभोळ हे एक मध्ययुगीन कालखंडातील प्रमुख बंदर असल्याचे बरेच उल्लेख आढळतात व त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दाभोळ बंदरात अरबस्तानातून होणारी घोड्यांची आयात.
Dabhol Bandar
Dabhol Bandar Dainik Gomantak
Published on
Updated on

कोकणातील दापोली तालुक्याच्या रत्नागिरी जिल्हात वसलेले दाभोळ हे ऐक प्राचीन शहर. अंजनवेल किंवा वशिष्ठी नदीच्या उत्तर काठावर टेकड्यांच्या पायथ्याशी दाभोळ शहर समुद्रापासून दोन मैल आत आहे.

कोकण किनारपट्टीवरील मुंबईच्या आग्नेय दिशेस सुमारे ८५ मैलावर दाभोळ हे ऐक मध्ययुगीन कालखंडात प्रमुख बंदरे असल्याचे बरेच उल्लेख आढळतात व त्याचे महत्त्वाचे कारण दाभोळ बंदरात अरबस्तानातून होणारी घोड्यांची आयात राहिलेली असली पाहिजे.

दाभोळचे जुने नाव दाभिलेश्वराच्या म्हणजेच शिवाच्या (दाभोळात दाभिलेश्वराचे जुने मंदिर आहे ) किंवा वनदेवता दाभ्यावरून पडले असावे, असे मानले जाते. प्राचीन काळी दाभोळ हे दालभ्यवती नावाने ओळखले जात होते. दालभ्य ऋषींच्या वास्तव्यावरून पडलेल्या या नावाचा कालांतराने दाभोळ असा अपभ्रंश झाला, असेही म्हटले जाते.

प्राचीन कालखंडात दाभोळ बंदराचा फारसा उल्लेख आढळत नाही. काही इतिहासकारांनी ‘पलियपटामय’ म्हणजे दाभोळ असे म्हटले आहे. दाभोळच्या इतिहासाचा मागोवा घेताना आपल्याला उल्लेख सापडतो तो दाभोळमधील प्रसिद्ध भूमिगत चंडिकादेवीचे मंदिराचा. ऐक युरोपीय प्रवासी क्रॉफर्ड यांच्या म्हणण्यानुसार बदामी शैलीत चालुक्य कालीन इ. स. ५५० ते ५७८ मधील मंदिरा आहे.

क्रॅकोर्डच्या मते आणि एका स्थानिक बखरी नुसार दाभोळ हे अकराव्या शतकात एका शक्तिशाली जैन राजाचे राज्य होते आणि त्यास पुरावा म्हणून इ. स. ११५६ (१०७८ शालीवाहन) चा शिलालेखही सापडला आहे. पुढे यादवांच्या काळात दाभोळ हे एक महत्त्वाचे बंदर होते. यादव काळात उद्योग-व्यापार भरभराटीचा होता. गोवा, दाभोळ व चौल बंदरातून परदेशात पैठणी, देवगिरी व दख्खनी कापड निर्यात केले जात असे. परदेशातून सुवर्णाचा मोठा ओघ भारताकडे असल्याचे त्या काळात नमूद आहे.

अरबांचे व्यापारामध्ये वर्चस्व होते. अल मसुदी, अल इताकरी, इब्न हौकल या अरब प्रवाशांच्या लिखाणातून, व आलेखांमधील माहितीनुसार तुर्की आक्रमणापुर्वीच कोकण किनारपट्टीवर मलबार पासून ते उत्तरेस संजान पर्यंत अरबांनी आपले बस्तान बसविले होते. यादवांचे राज्य नष्ट केल्यानंतर मलिक यकलाखी या सरदाराच्या कारकिर्दीत मलिक कफूर याने राज्यविस्तारासाठी दक्षिण भारतावर केलेल्या चौथ्या स्वारीत दाभोळ व चौलवर धडक मारली आणि मोठी लुट संपादन केली.

दाभोळ मध्ययुगात ‘मुस्तफाबाद’ म्हणून ओळखले जात होते.मुस्लिम इतिहासकार फरीश्तानुसार तेराव्या शतकाच्या मध्यात समुद्रापलीकडून रत्नागिरीस आलेल्या नसरुद्दिन शाह उर्फ आझम खान याने दाभोळ जिंकून घेतले. तेव्हा दाभोळचा हिंदू प्रमुख नागोजी रावाने त्यास जमिनीवरून व समुद्रातून प्रतिकार केला; पण तो व्यर्थ ठरला आणि आझमखानाच्या एका मुलाच्या नावावरून दाभोळला मुस्तफाबाद व दुसऱ्या एका वसाहतीस दुसऱ्या मुलाच्या नावावरून हमजाबाद अशी नावे देण्यात आली.

इ.स. १३४७ ते १५०० या बहामनिंच्या कालावधीत मुस्लिम सुभेदारांच्या नावावरून दाभोळ व इतर ठिकाणांना नावे देण्यात आली असावीत, असा एक अंदाज व्यक्त होतो. तर युसुफ आदिलशहाचा सरदार मुस्तफाखान याच्या नावावरून दाभोळास मुस्तफाबाद हे नाव पडले असे म्हटले जाते. मुस्तफाखान इ.स.१४९७ मध्ये दाभोळास होता व दाभोळ सुभा पूर्वी विजयनगरच्या अमलाखाली होता.

आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिल खान समुद्रमार्गे पहिल्यांदा दाभोळला आला तेव्हा तो दाभोळचा उल्लेख मुस्तफाबाद असे नकरता दाभोळचे वर्णन स्वर्गीय आनंद देणारे ठिकाण असे बहामनी सुलतान महुमूदशाह दुसरा (इ. स. १४८२ ते १५१८ ) याच्या राज्यातील मोठ्या शहरांमधील एक असे करतो. इ.स. १४७८ मध्ये गोव्याच्या बहामनी सुभेदारचा मुलगा बहादूरखान गिलानी याने दाभोळ ताब्यात घेतले व तेथे स्वतंत्र शासक म्हणून राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला.

त्याने गुजरात सुलतान महमूद बेगाडा ( इ.स १४५९ ते १५११) याच्या व्यापाऱ्यांची जहाजे दाभोळ बंदरात लुटल्यामुळे बेगाडाने बहामनी सुलतान महमूद दुसरा याकडे तक्रार केल्यामुळे महमूदशा बहामनीने इ.स. १४९४ मध्ये दाभोळ वर हल्ला करून बहादूरखान गिलानीचा पाडाव केला. काही ऐतिहासिक संदर्भानुसार बहादूर खान गिलानीचा दाभोळ मधील पाडाव महमूदशा बहामनीने न करता युसुफ आदिलशहाने केला.

परदेशातून येणारी व गुजरात किंवा मलबारहून मालवाहतूक करणारी जहाजे बहादूर खान गिलानी लुटत असे. मात्तबर व्यापाऱ्यांना तो डोईजड झाला होता. त्याचे पारिपत्य करणे आवश्यक होते. शेवटी युसुफ आदिलशहाने गिलानिविरुद्ध मोहीम उघडली व सर्व बाजूंनी त्याची कोंडी करून दाभोळच्या सागरीयुद्धात त्यास जेरीस आणले.

बहामनी राजवट अस्तास येत असताना विजापूरच्या आदिलशाहिचा अंमल वाढू लागला. दाभोळ बंदरात उतरलेल्या युसुफ आदिलखानने गुलबर्ग्याला जाऊन बहामनी राज्याच्या पदरी राहून बिजापूरला ( विजापूर ) स्वतंत्र राज्याची उभारणी केली.अंजनवेलची वहिवाट हस्तलिखितानुसार इ.स. १५०२ च्या सुमारास मुस्तफाखान या आदिलशाही सरदाराने पवाराच्या गढ्या उध्वस्त करून दाभोळ येथे सुभा स्थापन केला.

इ.स.१५०२ मध्ये रत्नागिरी, राजापूर, कुडाळ व दाभोळचा समावेश करून दाभोळ जिल्हाची निर्मिती केली . इ.स.१५०२ मध्ये या प्रदेशात नवीन महसूलधार पद्धती सुरु करण्यात आली. इ.स.१५०३ मध्ये दाभोळच्या धक्क्यावरील माँसाहेबांची मशीद विजापुरी स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. इ.स.१५०३ मध्ये भारतात आलेला इटालिअन प्रवासी वारथेमा दाभोळचे वर्णन एक सुंदर व समृध्द शहर असे करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com