Cartoonist Vivek Mehetre : हास्य, हास्यचित्रे व व्यंगचित्रे

Cartoonist Vivek Mehetre : एकदा विमानप्रवासात अमिताभ बच्चन हे सहप्रवासी होते. संवादा दरम्यान मेहेत्रेंचं नाव ऐकताच ते उद्गारले “Are you Cartoonist Vivek Mehetre?”
Cartoonist Vivek Mehetre
Cartoonist Vivek Mehetre Dainik Gomantak

मुकेश थळी

मेहेत्रे मुंबईत ठाण्यात राहतात. हल्लीच पणजीत त्यांची व्यंगचित्र कार्यशाळा झाली. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्याची फलश्रुती काय असे मी विचारले असता ते आनंदाने म्हणाले, त्यातील तिघे जण खचितच चांगले व्यंगचित्रकार होतील. इतरांनीही आपली व्यंगचित्रकला बरीच विकसित केली.

हसणं कमी होत आहे ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नव्हे. आमच्या एका पत्रकार मित्राला कपाळाला कायम आठ्या घालून फिरताना आम्ही विचारतो – जरा हसून घे रे. सगळ्या विश्वाची जबाबदारी तुझ्या डोक्यावर ठेवलीय का? बोचरे, व्यक्तिगत स्तरावरील शेरे, विनोद करत कुणालाही न दुखवता हसावं. मोकळेपणा ठेवावा.

हसवण्यासाठीच वृत्तपत्रात व्यंग्यचित्र असतं. ते व्यंगचित्र सभोवतालच्या जीवनातील घडामोडींतील विसंगती नेमकी टिपून त्यावर भाष्य करते.

समाजातील अपप्रवृत्ती, नेत्यांच्या बोलण्यातील आणि वागण्यातील विसंगती, विविध प्रकारचे भ्रष्टाचार, परिस्थितीमुळे सामान्य माणसाची होणारी कोंडी व घुस्मट यांचे मार्मिक दर्शन व्यंग्यचित्र घडवते. कधी थट्टामस्करी, तर कधी उपरोध- उपहास यांचा योग्य उपयोग करून हे चित्र रसिकाचे प्रबोधन करते.

योग्य काय, अयोग्य काय याचे त्याला भान आणून देते. त्याची खिलाडू वृत्ती आणि संवेदनक्षमता हसवत हसवत वाढवते. काही व्यंग्यचित्रे निखळ, निर्मळ हास्य निर्माण करतात; तर काही हसवता हसवता अंतर्मुख बनवतात. काही संदेश देणारी असतात.

व्यंग्यचित्र हसवणारे असेल किंवा नसेल; पण सुप्त वा उघड आक्रमकता मात्र त्यात जरूर असतेच. तसेच अनपेक्षित कलाटणी हेदेखील त्याचे आणखी एक वैशिष्ट्य होय. व्यंग्यचित्र हे चित्र व शब्द यांचे संयुक्त माध्यम असतं. ते वापरण्याचं कौशल्य थोड्याच कलाकारांकडे असतं.

ख्यातनाम व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे हे असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. हास्य-व्यंगचित्रकार, संपादक, लेखक, प्रकाशक, प्रभावी वक्ते, टीव्हीचे सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहुआयामी विवेक मेहेत्रे यांनी मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर उच्चशिक्षण M.E. पूर्ण केलेले आहे. लेखन, कविता, व्यंगचित्रे व एकपात्री कार्यक्रम अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करत असतानाच ते प्रथम वर्गात M.B.A. उत्तीर्ण झाले. पुढे MDT हा ट्रेनिंग अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला.

नुसतं व्यंगचित्र व त्यातील रेषा, पात्रांची नाकं, तोंडं बघून विवेक मेहेत्रे हे त्याचे रचनाकार आहेत हे आम्ही ओळखू शकतो. आघाडीच्या मराठी नियतकालिकांमध्ये गेली ३८ वर्षे त्यांची हजारो हास्यचित्रे नियमितपणे प्रकाशित झाली व होत आहेत. 14 भाषांमधून ती केली गेली आहेत.

ह्या कलेमुळे अनेक नामांकित व्यक्तींशी मेहेत्रेंच्या ओळखी झाल्या. अनेकांना भेटता आले. बाळासाहेब ठाकरे, विद्याधर गोखले, जयवंत दळवी, यशवंत रांजणकर, किरण चित्रे, दीपक खेडकर, वसुंधरा पेंडसे-नाईक, मधुकर पाटकर, बा.सी. अष्टीकर असे अनेक. बाळासाहेब ठाकरे यांनी टीव्ही मुलाखतीत आवडते व्यंगचित्रकार कोण असं विचारल्यावर विवेक मेहेत्रे असं सांगितलं होतं.

एकदा विमानप्रवासात अमिताभ बच्चन हे सहप्रवासी होते. संवादा दरम्यान मेहेत्रेंचं नाव ऐकताच ते उद्गारले “Are you Cartoonist Vivek Mehetre?” कारण चित्रपट विषयक नियतकालिकांमध्ये त्यांनी मेहेत्रेंची हास्यचित्रे पूर्वी पाहिलेली होती.

सन १९९३ पासून मेहेत्रे व त्यांची इंजिनियर पत्नी वैशाली `उदवेली बुक्स’ ही प्रकाशन संस्था चालवित आहेत. इतरांपेक्षा निराळे साहित्य वाचकांना मिळावे यासाठीच गेली २३ वर्षे ते दिवाळी अंक प्रकाशित करतात. आजवर 555 पुस्तके व ई-बुक्स प्रकाशित केली आहेत. त्यात 23 पुस्तके मेहेत्रेंचीच आहेत. हास्यकॉर्नर व हास्यविवेक ही त्यांची पुस्तके म्हणजे कार्टूनचं संकलन होय. कुणालाही भेट देण्यासारखी आहेत.

स्वतः अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्चशिक्षित असल्याने भारतीयांना संगणक व इंटरनेटचा परिचय व्हावा यासाठी मेहेत्रेंनी पुस्तके लिहिली. देश-विदेशात प्रेक्षक व आयोजकांचे आगळे अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत.

मेहेत्रे मुंबईत ठाण्यात राहतात. हल्लीच पणजीत त्यांची व्यंगचित्र कार्यशाळा झाली. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्याची फलश्रुती काय असे मी विचारले असता ते आनंदाने म्हणाले, त्यातील तिघे जण खचितच चांगले व्यंगचित्रकार होतील. इतरांनीही आपली व्यंगचित्रकला बरीच विकसित केली.

बहुश्रुत रसायन असे विवेकजींचं व्यक्तिमत्व. त्य़ामुळे त्यांना अनेक विषयांचं ज्ञान असल्यानं व्यंगचित्र विषय सहज सुचतो. दर दिवशी हे उतरणं म्हणजे मस्करी नव्हे. महाराष्ट्रात 36 व्यंगचित्रकार आणि देशात 113 व्यंगचित्रकार आहेत. काही राज्यात नाहीतच अशीही माहिती त्यांनी दिली. गोव्यात चार पांच सक्रिय कार्टूनिस्ट आहेत.

विविध विषयांवर मेहेत्रेंचे कार्यक्रम मुंबईत, इतरत्र व अऩेक देशात होत असतात. त्यात मोटीवेशनल व्याख्यानं, कार्टून कार्यशाळा, एकपात्री विनोदी कार्यक्रम अशी विविधता आहे. ए आय इंटेलीजन्स या विषयावर त्यांनी अगदी सोप्या भाषेत सामान्यांना समजेल अशा प्रकारे पुस्तकं, यु ट्युब विडियो केले आहेत.

कोरोनाच्या नकारात्मक कालखंडात अनेकजण तणावग्रस्त झाले होते. अशावेळी त्यांना सकारात्मक प्रेरणेची व प्रोत्साहनाची गरज होती. त्यासाठी मेहेत्रेंनी एक तास मुदतीचे ५० हून अधिक वेबिनार्स ‘झूम’ माध्यमाद्वारे घेतले.

देशभरातील लोकांनी त्यात भाग घेतला. तसेच विद्यार्थ्यांसाठी ६० दिवसात ६० वेबिनार्स कलाकृती, कार्टून्स, कॉमिक्स शिकवणारे प्रात्यक्षिक डेमोसह घेतले. याच कालखंडात त्यांनी नवनवीन यू-ट्यूब व्हिडियोज बनवले. ह्या विद्यार्थ्यांची वयं १२ वर्षांपासून ते ७५ वर्षांपर्यत होती हे विशेष!

लहानपणी आम्ही मार्मिक अंकातील बाळासाहेबांची व्यंगचित्रे पाहत असू. वाक्यांचा अर्थ त्या वयात कळत नव्हता. पण व्यंगचित्रांचे हे संस्काऱ झाले. कार्टून, कॉमिक्स ही बाल रंजनाची प्रकरणे त्या काळी नव्हती.

फुलबाग या मुलांच्या अंकात अशोक माहिमकर यांची व्यंगचित्रे रंजक असायची. टायम्स वाचायलो लागलो, तेव्हा सर्वप्रथम आर के लक्ष्मण यांची व्यंगचित्रे पाहण्याला प्राधान्य असे. आज त्यांचा अभाव जाणवतो. कार्टून अध्यापनाच्या शाळा असायला पाहिजे. या संदर्भात महाराष्ट्रात प्रयत्न झाले होते, पण पुढे शिक्षक वर्गाची अनुपलब्धता व इतर कारणांमुळे ते साकार झालं नाही असं विवेक मेहेत्रे यांनी सांगितलं.

खळाळणारं हास्य, जीवन प्रवास सैलसर करतं. मोकळा करतं. म्हणून हास्यचित्रं पाहिजेत. सभोवतालच्या जीवनातील विसंगती हेरून व्यंगचित्रकार आम्हाला हसवतो. काही गोष्टी हसण्यावारी न्यायच्या असतात याची जाणीव करून देतो. बहुतेक व्यंगचित्रं राजकीय वा सामाजिक स्थितीवरून बेतलेली असतात.

म्हणून प्रासंगिक असतात. पण हास्यचित्रांची पुस्तके जास्तीत जास्त हवी. कारण आपण हसणं विसरलो आहोत. इंग्रजीत एक म्हण आहे. कपाळाला आठ्या घालण्यास जास्त स्नायू लागतात. हसण्यास कमी. हसा.

एकदा विमानप्रवासात अमिताभ बच्चन हे सहप्रवासी होते. संवादा दरम्यान मेहेत्रेंचं नाव ऐकताच ते उद्गारले “Are you Cartoonist Vivek Mehetre?”

Cartoonist Vivek Mehetre
Goa Politics: देशभरात फक्त मोदी सरकारचीच जादू!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com