म्हादई : कलाकारांच्या अंतरातले भावविश्व

म्हादईच्या संवर्धनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी 'अर्बन स्केचर्स'च्या वतीने राज्यभरातल्या कलावंतांना आमंत्रित करण्यात आले होते.
Mhadai
Mhadai Dainik Gomantak

अनिल पाटील

गोमंतकीयांच्या जीवन मरणाचा विषय बनलेल्या म्हादईच्या सौंदर्याबरोबर तिच्या संवर्धनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी अर्बन स्केचर्स संस्थेच्या वतीने राज्यभरातल्या कलावंतांना आमंत्रित करण्यात आले होते.

सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसणारे जीवनदायिनी म्हादईचे सौंदर्य या कलावंतांनी आपल्या कुंचल्यातून साकारले.

केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकाच्या कळसा-भांडुरा या म्हादईच्या उपनद्यांचे पाणी वळवण्यासाठीच्या सुधारित सविस्तर आराखड्याला परवानगी दिल्यानंतर या विषयाचे गांभीर्य वाढत गेले आहे.

Mhadai
समुद्र दृष्टांत

राज्यात उभारल्या गेलेल्या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील काही कलावंतांनी आज मांडवी किनारी बसून म्हादईचे हे आरसपानी सौंदर्य आपल्या स्केचेसच्या माध्यमातून कॅनव्हासवर, कागदावर टिपले.

सेव्ह गोवा सेव्ह म्हादई फ्रंट, अर्थव्हिस्ट कलेक्टिव्ह आणि गोवा हेरिटेज ऍक्शन ग्रुप यांच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी 20 मे रोजी मांडवी किनारी मानवी साखळी करण्यात येणार आहे. याच आंदोलनाची पुर्वतयारी म्हणून आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी या कलावंतांनी आज हे स्केचेस चितारले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com