कोरोना महामारीमुळे (Covid 19) देशातील उद्योग क्षेत्रासह (Industry Sector) दूरसंचार क्षेत्र (Telecommunications sector) सध्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे सरकार या क्षेत्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी काही मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करु शकते असा कयास लावला जात आहे. खरं तर, मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक बुधवारी म्हणजेच आज होणार आहे, ज्याचे अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) भूषवणार आहेत. असेही सांगितले जात आहे की, या बैठकीत दूरसंचार क्षेत्राला दिलासा देण्यासाठी मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा (Announcement of financial package) पंतप्रधान करतील. त्याचबरोबर स्पेक्ट्रम पेमेंटबाबत महत्त्वाचा निर्णयही घेतला जाऊ शकतात. जर सरकारने स्पेक्ट्रम पेमेंटसंबंधी स्थगिती लावली तर त्याचा दूरसंचार कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो, असेही मानले जात आहे. त्यामुळे या कंपन्यांना अधिक लाभ मिळेल किंवा काही दिवसांसाठी आर्थिक सजीवता प्राप्त होईल. वास्तविक, अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्याकडे हजारो कोटींची कर्जे आहेत आणि त्यासाठी कर्ज परत करणे त्यांना क्रमप्राप्त आहे.
सरकार मोठी घोषणा करु शकते?
अनेक अहवालांनुसार, सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या मदत पॅकेजमध्ये कर भरण्यासंबंधी सूटही मिळू शकते असे वर्तविण्यात आले आहे. दूरसंचार क्षेत्राला एक वर्षाची स्थगिती दिली जाऊ शकते. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना एप्रिल 2022 पर्यंत स्पेक्ट्रम फी भरावी लागणार नाही असे सूचित करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने यासाठी टेलिकॉम कंपन्यांशी सातत्याने वाटाघाटीही सुरु केल्या होत्या. आता असे मानले जात आहे की, त्यांसंबंधी लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.
याशिवाय, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पेक्ट्रम सूट आणि बँक गॅरंटी कमी करण्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच, एजीआर प्रकरणातही सवलत मिळण्याची शक्यता आहे. आता टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांना सरकार कशी मदत करु शकते हे पाहावे लागेल.
50 हजार कोटींपेक्षा जास्त थकबाकी
व्होडाफोन इंडिया, यूके टेलिकम्युनिकेशन कंपनीची भारतीय शाखा आणि बिर्लाची टेलिकॉम कंपनी आयडिया सेल्युलर लि.च्या विलीनीकरणाने अस्तित्वात आले. कंपनीला विविध वैधानिक कामांसाठी सरकारचे 50,400 कोटी रुपये देणे आहे त्याच वेळी, व्होडाफोन आयडिया यावेळी आर्थिक संकटातून जात आहे.
31 मार्च 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीवर 1 लाख 80 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. यामध्ये सुमारे 96270 कोटी रुपये स्पेक्ट्रम शुल्काचे आहेत. बँकांची थकबाकी 23 हजार कोटींच्या जवळपास आहे आणि एजीआरची थकबाकी 58254 कोटी आहे. कंपनीने आत्तापर्यंत फक्त 7854 कोटी AGR थकबाकी भरली आहे. तरीही कंपनीला 50 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम अजून जमा करायची आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.