YouTube वर आता फक्त 500 सब्सक्राइबर्सही करुन देऊ शकतील कमाई, वाचा नवे नियम

YouTube ने म्हटले आहे की ते YouTube पार्टनर प्रोग्रामसाठी पात्रता आवश्यकता सुलभ करत आहे आणि कमी फॉलोअर्स असलेल्या क्रिएटर्ससाठी कमाई करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे.
YouTube
YouTubeDainik Gomantak

Youtube Earning Tips: तुम्ही देखील YouTube कंटेंट क्रिएटर असाल तर ही एक आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे. आता तुम्हाला तुमच्या YouTube चॅनेलच्या कमाईची काळजी करण्याची गरज नाही. कारण आता तुमच्या YouTube चॅनल 500 सब्सक्राइबर्स असले तरीही कमाइ सुरु होणार आहे. यासाठी कंपनीने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. यापूर्वी, चॅनलवर कमाईसाठी किमान 1000 सब्सक्राइबर्सची आवश्यकता होती.

YouTube ने म्हटले आहे की ते YouTube पार्टनर प्रोग्रामसाठी असलेली पात्रता आवश्यकता सुलभ करत आहे आणि कमी सब्सक्राइबर्स असलेल्या क्रिएटर्ससाठी कमाई प्रक्रिया सुलभ करत आहे. कंपनी कमाई प्रक्रियेची मर्यादा कमी करत आहे. म्हणजेच, आता कमी फॉलोअर्स असलेले क्रिएटर्स देखील त्यांच्या YouTube चॅनेलवर कमाई करू शकतील.

  • YouTube ने हे नियम बदलले आहेत

यापूर्वी क्रिएटर्सला युट्युब पार्टनर प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या कटेंटवर कमाई करण्यासाठी अनेक निकष पूर्ण करावे लागतील. परंतु आता नवीन नियमानुसार, क्रिएटर्सला कमाइ करण्यासाठी फक्त 500 सदस्यांची आवश्यकता आहे. जी आधीपेक्षा खुप कमी आहे. त्याच वेळी, YouTube ने देखील 4000 वॉच अव्हर्सवरुन 3000 केले आहे. म्हणजेच आता वर्षभरात केवळ 3000 वॉच अव्हर्स पुर्ण करावे लागतील.

YouTube
Multibagger Stocks : तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत का? 20 वर्षांत दिला आहे 500 पट परतावा

तसेच Youtube Shorts व्ह्यूज 10 दशलक्ष वरून 3 मिलियन पर्यंत कमी झाले आहेत. म्हणजेच क्रिएटर्सला चॅनेलवर कमाई करण्यासाठी, 90 दिवसांत 30 लाख Youtube Shorts व्ह्यूज असणे आवश्यक आहे. हे नियम पहिले अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये लागू केले जातील. यानंतर ते इतर देशांमध्येही लागू केले जाऊ शकते.

  • छोट्या क्रिएटर्सला मिळेल फायदा

YouTube च्या नवीन कमाई प्रक्रियेचा लहान आणि नवशिक्या YouTubers ला खूप फायदा होणार आहे. त्यांना आता YouTube वर त्यांच्या कटेंटवर कमाई करण्याच्या अधिक संधी मिळणार आहे. त्यांचे प्रेक्षक वाढवण्यासाठी आणि जाहिरातींचा पैसा मिळविण्यासाठी त्यांना काही बेंचमार्क पूर्ण करणे आवश्यक आहे. रिव्हन्यु शेअरिंग बदललेली नाही. दुसरीकडे, YouTube पार्टनर प्रोग्राम आधीच समावेस केलेल्या क्रिएटर्संना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसणार.

प्रोग्राममध्ये सहभागी झाल्यानंतर क्रिएटर्स सुपर थँक, सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स यांसारख्या अनेक फायदेशीर टुल एक्सेसचा वापर करु शकतात. क्रिएटर्स चॅनल मेंबरशिपसारख्या सब्सक्रिपशन टुलचा वापर करु शकतात. Youtube शॉपिंगमध्ये देखील प्रोडक्टला प्रमोट करु शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com