IRCTC ला ट्विट करणे पडले महाग, महिलेने गमावले तब्बल 64 हजार; वाचा संपूर्ण प्रकरण

सोशल मिडियावरील निष्काळजी पडू शकतो महाग, वेळीच व्हा सावध.
IRCTC
IRCTC Dainik Gomantak

आधुनिक जगात सोशल मीडियाचा लोकांना अनेक प्रकारे फायदा होतो. पण त्याचा वापर किती करावा आणि कसा करावा हे आपल्या हातात आहे. या सोशल मिडियाच्या माध्यमातून लोक त्यांचे समस्या, मत, विचार लोकसंख्येपर्यंत पोहोचवू शकतात. इतकेच नाही तर अनेक लोक त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या समस्या सहजपणे सार्वजनिक क्षेत्रात मांडू शकतात. सोशल मीडियाचा (Social Media) फायदा केवळ लोकांनाच मिळत नाही, तर फ्रॉड देखील मोठ्या प्रमाणत होतात.

लोकांच्या चुकीमुळे त्यांची फसवणूक होते.असाच काहीसा प्रकार मुंबईतील एका महिलेसोबत घडला आहे. महिलेच्या एका चुकीमुळे तने 64 हजार रुपये गमावले आहे. जाणून घेउया प्रकरण काय आहे.

  • काय आहे संपूर्ण प्रकरण?

महिलेला तिच्या आरएसी तिकिटाचे अपडेट जाणून घ्यायचे होते आणि त्यासाठी तिने ट्विटरवर आयआरसीटीसीला टॅग करून ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने आपला मोबाईल नंबर आणि तिकिटची माहिती शेअर केली होती.

एमएन मीना यांनी 14 जानेवारीची तीन तिकिटे आयआरसीटिसी (IRCTC) वेबसाइटवरून बुक केली होती. पण त्यांची तिकिटे आरएसी झाली. तिकिटाच्या चौकशीसाठी त्याने आपला नंबर आणि ट्रेनचे तिकीट आयआरसीटिसीला ट्विट केले होते. फसवणूक करणाऱ्यांनी तिच्या चुकीचा फायदा घेत तिची फसवणूक केली.

IRCTC
Goa Petrol-Diesel Price: नो चेन्ज! गोव्यातील पेट्रोल- डिझेलचे दर जैसे थे, जाणून आजचे भाव

2 रुपये पेमेंट करण्यासाठी गमावले 64 हजार

ट्विट केल्यानंतर थोड्याच वेळात एमएन मीना यांना स्कॅमर्सचा कॉल आला. स्कॅमर्सनी स्वतःची ओळख आयआरसीटिसीचे कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून दिली. फसवणूकदाराने आरएसी तिकीट कन्फर्म करण्यास मदत करण्यास सांगितले.

यानंतर त्या व्यक्तीने महिलेच्या फोनवर लिंक पाठवली आणि तिला सर्व माहिती भरण्यास सांगितले. यासोबतच फसवणूकदाराने त्याला दोन रुपयांचा व्यवहार करण्यास सांगितले. फसवणूकदाराने सांगितल्याप्रमाणे त्या महिलेने केले. तिने प्रक्रियेचे अनुसरण करताच त्याला त्या महिलेच्या खात्यातून 64,011 रुपयांच्या ट्रांजेशनचा मॅसेज आला.

त्या महिलेला जेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेतली. विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर महिलेने त्या नंबरवर अनेक वेळा कॉल केला, मात्र तो नंबर बंद होता.

  • सायबर फ्रॉडपासून राहा सावध

तुमच्या बॅंकेशी संबंधीत कुठलीही माहिती कोणालाही देऊ नका. तसेच, एखाद्याच्या विनंतीवर कोणत्याही लिंकवर पैसे देऊ नका. ज्याप्रकारे मीना यांच्यासोबत सायबर फसवणूक झाली, तुम्ही खबरदारी न घेतल्यास तुम्हीही त्याचा बळी होऊ शकता. फिशिंग लिंक किंवा कोणत्याही अज्ञात लिंकवर पैसे देऊ नका. अशा मॅसेज किंवा कॉल्सपासून सावध राहा. तुमची वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करू नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com