दरवर्षी PPF, SSY, NPS मध्ये पैसे जमा का करावे?

पीपीएफ (PPF) सक्रिय ठेवण्यासाठी किमान 500 रुपये गुंतवणूक ठेवणे आवश्यक आहे.
Money Saving
Money Saving Dainik Gomantak
Published on
Updated on

तुम्ही वर्षाच्या शेवटी बचत आणि पेन्शन योजना, आवश्यक असलेली गुंतवणूक केली आहे की नाही हे तपासायला हवे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) समृद्धी योजना (SSY)मध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात किमान गुंतवणूक अनिवार्य आहे. निष्क्रिय खाते कसे सक्रिय करावे हेसमजून घेऊया.

*PPF:

पीपीएफ (PPF) सक्रिय ठेवण्यासाठी किमान 500 रुपये गुंतवणूक ठेवणे आवश्यक आहे. ए सक्रिय करण्यासाठी तुम्हाला बँकेत (Bank) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यात आले होते तेथे अर्ज करावा लागेल. अर्जासह तुम्हाला प्रत्येक डीफॉल्ट वर्षासाठी 50 रुपये, भरलेल्या सर्व वर्षासाठी 500 रुपये आणि खाते सक्रिय कराल त्या वर्षासाठी 500 रु शुल्क भरावे लागतात. पीपीएफमध्ये कोणातीही कमाल योगदान मर्यादा नाही, तुम्हाला प्रति आर्थिक वर्षे फक्त 1.5 लाख रुपयापर्यंत कर सूट आणि व्याज मिळते. तुम्ही खाते सक्रिय केल्याशिवाय तुम्ही अनुक्रमे तीन आणि पाच वर्षांनंतर पीपीएफ शिल्लकवर कर्ज घेवू शकत नाही किंवा आंशिक पैसे काढू शकत नाही. बंद खात्यातील थकबाकीवर मुदतपूर्तीपर्यंत व्याज मिळते. डिफॉल्ट खाती मॅच्युरिटीनंतर सक्रिय केले जाऊ शकत नाहीत आणि जर तुमचे खाते मॅच्युरिटीच्या वेळी बंद झाले तर तुम्ही पुढील पाच वर्षासाठी खाते कॅरी फॉरवर्ड करू शकत नाही.

Money Saving
केंद्र सरकार आखतय समाजकल्याणकारी योजना

* एनपीएस:

उच्च मर्यादा नसलेल्या NPS टियर 1 खात्यांमध्ये प्रति आर्थिक वर्षे 1000 रुपये किमान योगदान आवश्यक आहे. टियर IT खात्यांसाठी कोणतेही किमान अनिवार्य योगदान नाही. डिफॉल्टनुसार तुमचे टियर 1 खाते फ्रीज होईल. जे खातेधारक ऑनलाइन व्यवहार करतात ते प्रत्येक डिफॉल्ट वर्षासाठी 100 रुपये दंडासह 1000 रुपये दंड भरून ते थेट नियमित करू शकतात. ऑफलाइन खातेधारकांशी त्यांच्या उपस्थितीत अनफ्रीझिंगची प्रक्रिया सुरू करण्यासाठी लिहावे.

* SSY:

एसएसवाय (SSY) खाते सक्रिय ठेवण्यासाठी पालक/ कायदेशीर पालकांना किमान रु. 250 भरावे लागतील. डिफॉल्ट प्रति वर्षे 50 रुपये दंड आकारला जातो. खाते नियमित न ठेवल्यास व्याजवर परिणाम होणार नाही आणि शिल्लक रकमेवर 21 वर्षाच्या मुदतपूर्तीपर्यंत व्याज मिळेल. SSY मध्ये केवळ 15 वर्षापर्यंत ठेवी ठेवण्याची परवानगी आहे, त्यापूर्वी खाते सक्रिय केले जाऊ शकत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com