तुमच्या बँकेची मोफत एटीएम व्यवहार मर्यादा किती? नंतर किती दंड भरावा लागेल? वाचा तपशील

आता तुम्ही कोणत्याही एटीएममध्ये लिमीटपेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.
ATM Transaction Charges
ATM Transaction ChargesDainik Gomantak
Published on
Updated on

एटीएममधून बेधडकपणे व्यवहार करण्याची वेळ निघून गेली आहे. आता तुम्ही कोणत्याही एटीएममध्ये लिमीटपेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. केवळ दंडच नाही तर जीएसटीही वेगळा भरावा लागणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांसाठी वेगवेगळ्या बँका जास्त दंड आकारत आहेत. (What is your bank free ATM transaction limit How much fine will be paid later Read the details)

ATM Transaction Charges
FD Rates Hiked: 'या' खाजगी क्षेत्रातील बँकेने केला हा मोठा बदल!

आज आम्‍ही तुम्‍हाला देशातील 3 प्रमुख बँकांकडून एटीएममधून लिमीटपेक्षा जास्त व्‍यवहार करण्‍यावर आकारण्‍यात येणार्‍या दंडाविषयी सांगणार आहोत. परंतु, यासोबतच, तुमच्यासाठी हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील विविध शहरांसाठी एटीएम व्यवहारांसाठी वेगळी मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.

देशातील या 6 शहरांमध्ये तुम्ही इतर बँकांचे एटीएम फक्त 3 वेळा वापरू शकता

आरबीआयच्या नियमांनुसार, देशातील 6 शहरे - दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता अशा शहरांमध्ये समाविष्ट आहेत जिथे तुम्ही इतर बँकेचे एटीएम फक्त 3 वेळाच वापरू शकतात. ही 6 शहरे वगळता उर्वरित देशातील इतर बँकांच्या एटीएममधून तुम्ही एका महिन्यात जास्तीत जास्त 5 मोफत व्यवहार करू शकणार आहात.

येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की विनामूल्य एटीएम व्यवहारांमध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांचा समावेश असतो. म्हणजेच, तुम्ही एटीएममधून पैसे काढा किंवा फक्त खात्यातील रक्कम तपासा, ते तुमच्या मर्यादेत भर घालत राहणार आहेत. मर्यादेनंतर, आर्थिक व्यवहारांवर जास्त आणि गैर-आर्थिक व्यवहारांवर कमी दंड असणार आहे.

ATM Transaction Charges
Nokia T20: नोकिया टॅबलेट मोठा डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च

स्टेट बँक ऑफ इंडिया

जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि इतर बँकेच्या एटीएममधून व्यवहाराची निर्धारित मर्यादा पूर्ण केली असेल, तर त्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. यासोबतच तुम्हाला त्यावर जीएसटी देखील भरावा लागेल. याशिवाय जर तुम्ही SBI ATM ची मर्यादा पूर्ण करत असाल तर त्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर 10 रुपये आणि GST भरावा लागणार आहे.

HDFC बँक

तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल आणि इतर बँकेच्या ATM मधून व्यवहाराची निर्धारित मर्यादा पूर्ण केली असेल, तर त्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपये अधिक GST भरावा लागेल. याशिवाय, एचडीएफसी बँकेच्या एटीएमची मर्यादा पूर्ण केल्यानंतरही तुम्हाला 21 रुपये आणि जीएसटी भरावा लागणार आहे. एचडीएफसी बँकेचे ग्राहक त्यांच्या बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात 5 मोफत व्यवहार करू शकणार आहेत.

आयसीआयसीआय बँक

जर तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक असाल आणि इतर बँकेच्या ATM मधून व्यवहारांची निर्धारित मर्यादा पूर्ण केली असेल, तर त्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर GST सोबत 21 रुपये जास्त भरावे लागणार आहेत. आणि जर तुम्ही ICICI बँकेच्या ATM मधून मर्यादा पूर्ण करत असाल, तर तुम्हाला त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपये अधिक GST भरावा लागणार आहे. ICICI बँकेचे ग्राहक त्यांच्या बँकेच्या ATM मधून एका महिन्यात 5 वेळा मोफत व्यवहार करू शकतात.

एटीएम व्यवहारांसाठी वेगवेगळ्या बँकांकडून आकारल्या जाणार्‍या शुल्कांबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता आणि याशिवाय, तुम्ही तुमच्या शाखेत जाऊन एटीएम व्यवहारांशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com