MP Salary In India: तुम्हाला माहितीये का खासदाराला किती पगार मिळतो? 'या' गोष्टींचा मिळतो लाभ

MP Salary: दर 5 वर्षांनी तुम्ही तुमचा संसद सदस्य (MP) मतदानाद्वारे निवडता आणि नंतर तो लोकसभेत तुमच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

MP Salary: दर 5 वर्षांनी तुम्ही तुमचा संसद सदस्य (MP) मतदानाद्वारे निवडता आणि नंतर तो लोकसभेत तुमच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. आपल्या क्षेत्राशी निगडीत प्रश्न तो संसदेत मांडतो. हे सर्व काम करण्यासाठी खासदाराला दर महिन्याला किती पगार मिळतो आणि कोणते भत्ते मिळतात ते जाणून घेऊया... प्रत्येक खासदाराला दर महिन्याला मूळ वेतन म्हणून 1 लाख रुपये मिळतात. याशिवाय त्यांना 54 हजार रुपये कार्यालय भत्ता आणि 49 हजार रुपये मतदारसंघ भत्ता दिला जातो. अशाप्रकारे दर महिन्याला खासदाराला सुमारे दोन लाख रुपये पगार मिळतो. खासदारांना उपलब्ध असलेल्या इतर भत्ते आणि सुविधांबद्दल जाणून घेऊया...

पगाराव्यतिरिक्त खासदारांना मिळणारे भत्ते

थेट थकबाकी म्हणून वार्षिक 3 लाख 80 हजार रुपये, विमान प्रवास भत्ता म्हणून वार्षिक 4 लाख 8 हजार रुपये, रेल्वे प्रवास भत्ता म्हणून वार्षिक 5 हजार रुपये, पाणी भत्ता आणि वीज भत्ता म्हणून वार्षिक 4 हजार रुपये मिळतात.

Money
Old Pension Scheme बाबत मोठी अपडेट, 'या' मुख्यमंत्र्यांनी केंद्राचे ऐकलेच नाही; पैसे कुठून येणार?

दर महिन्याला खासदाराला इतके पैसे मिळतात

विशेष म्हणजे, एखाद्या खासदाराचा निश्चित पगार आणि इतर भत्ते जोडले तर त्याला सरकारकडून (Government) दरमहा 3 लाख रुपयांहून अधिक रक्कम दिली जाते. प्रत्येक खासदाराचा वार्षिक खर्च 36 लाखांपेक्षा जास्त आहे.

Money
Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, जुनी पेन्शन लागू करण्याबाबत आली मोठी अपडेट

पगारावर कर नाही

खासदारांच्या पगाराची खास गोष्ट म्हणजे त्यांच्या पगारावर कोणताही टॅक्स (Tax) लागत नाही. याशिवाय राहण्यासाठी सरकारी बंगलाही उपलब्ध आहे. त्यांना बंगल्यातील फर्निचर, एसी आणि देखभालीचा खर्चही करावा लागत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com