
पगारदार व्यक्तींना आयकर रिटर्न (ITR) भरताना फॉर्म-16 आवश्यक असतो. आयटीआरसाठी फॉर्म-16 हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आज आम्ही तुम्हाला फॉर्म -16 म्हणजे काय? फॉर्म-16 साठी आयकर विभागाचे काय नियम आहेत आणि फॉर्म-16 मध्ये कोणती माहिती समाविष्ट असते याबद्दल सविस्तररित्या सांगणार आहोत...
दरम्यान आयकर कायद्याच्या कलम 203 नुसार, कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 जारी करणे बंधनकारक आहे. जर कंपनीने फॉर्म 16 जारी केला नाहीतर दंड होऊ शकतो. आयकर कायद्याच्या कलम 272 अंतर्गत, दररोज 100 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. फॉर्म 16 (Form 16) मध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पगाराची म्हणजेच उत्पन्न आणि कर याबद्दल माहिती असते. फॉर्म 16 हे कंपनीकडून दिले जाणारे वार्षिक प्रमाणपत्र असते. पगारातून किती टॉक्स कापला गेला आहे याची माहिती कर्मचाऱ्यांना (Employees) एका फॉर्मद्वारे दिली जाते. तुम्हाला तुमच्या कंपनीकडून फॉर्म 16 दिला जातो. या फॉर्मद्वारे, कंपनी तुमच्या पगारावर देय असलेल्या टॅक्स वजावटीच्या स्रोतावर (टीडीएस) पुराव्याची पूर्तता देते.
फॉर्म 16 मध्ये दोन पार्ट असतात. पार्ट A आणि पार्ट B.
पार्ट A: फॉर्म 16 च्या पार्ट A मध्ये तुमच्या आणि तुमच्या कंपनीबद्दलची माहिती आणि कापलेल्या कराची माहिती असते. कंपनीचा TAN नंबर तसेच, कंपनी आणि कर्मचाऱ्याचा पॅन, पत्ता, असेसमेंट ईयर, नोकरीचा कालावधी आणि सरकारकडे जमा केलेल्या TDS ची थोडक्यात माहिती असते. इतकेच नाही तर, या पार्टमध्ये कंपनीने दर तिमाहीत कापलेल्या कराची संपूर्ण माहिती देखील असते, जी कर्मचाऱ्याद्वारे प्रमाणित केलेली असते.
पार्ट B: फॉर्म 16 च्या पार्ट B बद्दल बोलायचे झाल्यास, त्यात तुमच्या पगाराची आणि कर सवलतीची माहिती असते. यामध्ये, तुम्हाला तुमच्या पगाराचे विभाजन, आयकर कायद्यांतर्गत उपलब्ध असलेली कर सूट आणि कलम 89 अंतर्गत उपलब्ध असलेली सवलत याबद्दल माहिती दिली जाते.
फॉर्म 16 हा एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती असते. प्रत्येक आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना हा फॉर्म देणे बंधनकारक आहे. फॉर्म 16 च्या मदतीने तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न सहजपणे भरु शकता कारण त्यात तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये (Income Tax Return) द्यावी लागणारी सर्व माहिती असते. फॉर्म 16 TRACES वेबसाइटवरुन डाउनलोड करता येतो, परंतु पूर्णपणे नाही. TRACES म्हणजे TDS रिकॉन्सिलिएशन अॅनालिसिस अँड रेक्टिफिकेशन एनेबल्ड सिस्टम. त्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे.
www.tdscpc.gov.in/en/home.html या वेबसाइटला भेट द्या.
आता 'लॉगिन' सेक्शनमध्ये जा आणि ड्रॉपडाउन मेनूमधून 'टॅक्सपेयर' ऑप्शन निवडा.
आयडी, पासवर्ड आणि पॅन वापरुन लॉग इन करा.
'टॅक्स क्रेडिट्स पाहा किंवा पडताळणी करा' सेक्शनमध्ये जा.
प्रोव्हिजनल टीडीएस सर्टिफिकेट 16/16A/27D निवडा.
एक पेज उघडेल, येथे तुम्हाला कंपनीचा TAN, आर्थिक वर्ष, ज्या तिमाहीसाठी विनंती केली आहे ती प्रविष्ट करावी लागेल.
'प्रोव्हिजनल सर्टिफिकेट टाइप' टाकून फॉर्म 16, 16A, 27D मधून तुम्हाला डाउनलोड करायचा असलेला फॉर्म निवडा.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, येथे 27D हा एक असा प्रकार आहे, जो तीन महिन्यांच्या तपशीलांबद्दल सांगतो. करदात्याने सरकारला कर भरला आहे की नाही हे ते सांगते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.