'Bitcoin' चे काय आहे आभासी चलन

बिटकॉइन (Bitcoin) ही आज सर्वात जास्त विश्वासार्ह क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मानली जाते.
काय आहे आभासी चलन
काय आहे आभासी चलन Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात (Goa) देखील एका नामांकित शाळेने आपल्या एका विद्यार्थ्याचा, गजेश नाईक याचा, त्यांने क्रिप्टोकरन्सीसाठी सॉफ्टवेअर (Software) विकसित केल्याबद्दल सत्कार घडवून आणला होता. पोलीगॅज आणि स्टेबलगॅज ह्या त्याने विकसित केलेल्या अप्लिकेशनमधून कोट्यवधी डॉलर्सचे व्यवस्थापन झाले होते. गणेशसारखे गोव्यात (Goa) वेगवेगळ्या ॲपच्या (App) सहाय्याने क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार करणारे आणखीनही काहीजण नक्कीच असतील.

काय आहे ही क्रिप्टोकरन्सी? करन्सी म्हणजे चलन. सोप्या शब्दात पैसेच! जगात वेगवेगळ्या देशाची वेगवेगळी चलने असतात. जशी, भारताचा रुपया, अमेरिकेचे डॉलर, ब्रिटनचा पाऊंड किंवा दुबईचे (Dubai) धिरम. क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) हे असेच एक चलन आहे पण डिजिटल (Digital) चलन किंवा आभासी चलन. कोणत्याही देशाचे सरकार किंवा कुठलीच बँक (Bank) हे चलन छापत नाही पण जगात ज्याप्रकारे वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी चलने असतात त्याचप्रमाणे क्रिप्टोकरन्सीदेखील वेगवेगळ्या असतात. बिटकॉइन (Bitcoin) ही आज सर्वात जास्त विश्वासार्ह क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मानली जाते. बिटकॉइनसारख्याच (Bitcoin) आणखीनही क्रिप्टोकरन्सी आहेत. उदाहरणार्थ, झेडकॅश, रीपल, लाईटकॉइन इत्यादी. फेसबुकही (Facebook) त्यांची क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) निर्माण करायच्या करण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या क्रिप्टोकरन्सीचे नाव असेल लिब्रा.

काय आहे आभासी चलन
Systematic investment plan: 7,000 रुपयांच्या SIP मधून मिळवा 8 लाख रुपये पेन्शन

आता हे आभासी चलन (Currency) तुमच्‍या मालकीचे कसे होऊ शकते? ते आधी तुम्हाला तुमच्या पैशातून विकत घ्यावे लागेल. काल 3 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता एक बिटकॉइनची (Bitcoin) किंमत होती, साधारण पंचेचाळीस लाख रुपये. ही किंमत क्षणाक्षणाला बदलत असते. सकाळी एक्स्चेंज सुरू झाले त्यावेळी हा दर होता 44.46 लाख रुपये. विनियमासाठी वेगवेगळी एक्स्चेंजेस असतात. जशी, बिनन्स, कॉइनबेस, कॉइनस्विच, युनिकॉइन..इत्यादी. या प्रत्येक एक्सचेंजमधल्या दरात थोडाफार फरक असतोच.

क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) खरेदी केल्यावर तुमचे एक वॉलेट तयार होते. त्यात हे चलन तुम्ही साठवू शकता. अशा प्रत्येक खरेदीनंतर एक ब्लॉक तयार होतो. याला मायनिंग असे म्हणतात. जितके अधिक ब्लॉक, तितके अधिक मायनिंग. जगात आता हजारो दुकानांमधून क्रिप्टोकरन्सी स्वीकारली जाते. भारतातही (India) काही कंपन्यांनी ब्लॉकचेनच्या माध्यमातून अशा व्यवहारासाठी बँकांबरोबर करार केले आहेत. ब्लॉकचेन हे बिटकॉइन (Bitcoin) या आभासी चलनाच्या देवाणघेवाणीसाठी तयार करण्यात आलेले एक नेटवर्क आहे. ही देवाण-घेवाण त्या नेटवर्कवर (Network) असलेल्या दोन व्यक्तींमध्ये होऊ शकते आणि त्यांच्यावर कुणाचीही देखरेख नसते. हे व्यवहार अगदी गुप्त राहतात. हे आभासी पैसे (Money) कम्प्युटरच्या (Computer) कोडभाषेत (एनक्रिप्टेड) असतात. ही कोडभाषा बिटकॉइनची (Bitcoin) यंत्रणा चालवणार्यानाही ठाऊक नसते.

अर्थात हे आभासी चलन (Currency) असल्यामुळे सारे दैनंदिन व्यवहार या चलनातून करणे शक्य नाही. विजेचे बिल, टॅक्स (Tax) , इत्यादी गोष्टींसाठी हे चलन सध्यातरी स्वीकारले जाणे शक्य नाही पण इंटरनेटवरून (Internet) व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपन्यांनी बिटकॉइन (Bitcoin) स्वीकारायला सुरुवात केली आहे. अनेक आभासी चलनांच्या यादीत विश्वासार्हतेच्या बाबतीत बिटकॉइन हे आभासी चलन आघाडीवर आहे. ज्यांच्याकडे बिटकॉइंन (Bitcoin) आहेत ते बहुतेकजण याकडे गुंतवणूक म्हणून पाहतात. एकाच वर्षात बिटकॉइंनचे (Bitcoin) मूल्य 900 टक्क्यांनी वाढलेले आहे. त्यामुळे अनेकजण श्रीमंत झाले आहेत. आज जगात जवळ-जवळ दोन कोटी लोक बिटकॉइन (Bitcoin) हे आभासी चलन वापरत आहेत असा अंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com