UPIची नवीन पेमेंट्सला स्पर्धा; 'Buy Now Pay Latter'ला पसंती

Buy now, pay later सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आणि ऑफलाइन पेमेंट्स पुढील पाच वर्षांत भारतात डिजिटल पेमेंटच्या वाढीला गती देऊ शकतात.
Buy now pay later
Buy now pay laterDainik Gomantak
Published on
Updated on

ऑनलाइन व्यवहार प्लॅटफॉर्म UPI देशातील डिजिटल पेमेंट लँडस्केपवर वर्चस्व कायम ठेवण्याची शक्यता असल्याचे चित्र दिसून यात आहे, BNPL आणि डिजिटल चलन यांसारख्या नवीन पद्धतींमुळे भविष्यातील पेमेंट परिभाषित होण्याची देखील शक्यता आहे. पीडब्ल्यूसी इंडियाने एका अभ्यास अहवालात म्हटले की युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय), 'बाय नाऊ पे लेटर (Buy now, pay later) सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीटी) आणि ऑफलाइन पेमेंट्स पुढील पाच वर्षांत भारतात डिजिटल पेमेंटच्या वाढीला गती देऊ शकतात. (UPI competition for new payments Prefer Buy Now Pay Latter)

Buy now pay later
राज्यसभा सचिवालयात या पदांवर परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

अहवालानुसार, UPI चे डिजिटल पेमेंट स्पेसमध्ये मोठे योगदान राहील, त्यानंतर BNPL. PwC द्वारे 'द इंडियन पेमेंट्स हँडबुक 2021-26' या शीर्षकाच्या अहवालात असे नमूद केले आहे की भारतीय डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये संख्यांच्या बाबतीत 23 टक्क्यांनी मजबूत वाढ झाली आणि FY2025-26 पर्यंत 217 अब्ज व्यवहार होण्याची देखील शक्यता आहे. मूल्याच्या दृष्टीने, पुढील पाच वर्षांत हा आकडा 5,900 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.

अहवालात म्हटले की, 2020-21 मध्ये UPI द्वारे 22 अब्ज डिजिटल व्यवहार झाले होते आणि 2025-26 पर्यंत ते 169 अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारे, वार्षिक आधारावर 122% ची तीव्र वाढ देखील नोंदविली जाऊ शकते. अहवालानुसार, UPI द्वारे कमी-मूल्याचे व्यवहार आणि आशियातील इतर देशांसोबत क्रॉस-बॉर्डर रेमिटन्ससाठी भागीदारी देखील या वाढीला चालना देण्यास मदत करत आहे.

तुम्हाला बीएनपीएल का आवडते?

BNPL मध्ये सध्या 36,300 कोटी रुपयांचे सुमारे 363 अब्ज व्यवहार आहेत, जे पुढील पाच वर्षांत 3,19,100 कोटी रुपयांचे 3,191 अब्ज व्यवहार पार करतील असे म्हटले जात आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की बीएनपीएलचा पर्याय ई-कॉमर्सने सुरू केला होता, आणि जो आता अॅपद्वारे पेमेंटचा पर्याय ऑफर करणाऱ्या इतर प्लॅटफॉर्मद्वारे स्वीकारला जात आहे. यामध्ये खरेदीवर तात्काळ पैसे देण्याऐवजी ठराविक मुदत तुम्हाला दिली जाते. यामुळे ग्राहकांना पैसे भरण्यासाठी थोडा वेळ मिळतो आणि त्यांना त्यांच्या आवडीची खरेदी करण्याची चिंता करण्याची गरज नसते.

Buy now pay later
लोकांची म्युच्युअल फंड्सकडे वेगाने वाटचाल; एका वर्षात 3.17 कोटी नवीन खाती

मिहीर गांधी, भागीदार आणि पेमेंट्स ट्रान्सफॉर्मेशनचे प्रमुख, PwC इंडिया म्हणतात की, नियामक, बँका, पेमेंट आणि फिनटेक कंपन्या, तसेच कार्ड नेटवर्क आणि सेवा प्रदात्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे डिजिटल पेमेंट उद्योग येत्या काही वर्षांत प्रचंड प्रॉफिटच्या वाढीसाठी सज्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com