Sensex, Nifty: भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांक 23 सप्टेंबरच्या सत्राच्या शेवटच्या टप्प्यात जवळपास 2 टक्क्यांनी घसरला. याचं कारणही थक्क करायला लावणार आहे. दुसरीकडे, यूएस फेडने वाढवलेला व्याजदर आणि चीनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचा जागतिक आर्थिक वाढीवर परिणाम झाला असावा, असे शेअर्सधारकांना वाटत आहे. त्याचबरोबर ICICI सिक्युरिटीजच्या विश्लेषकांच्या मते, महागाईवर नियंत्रण ठेवताना फेडच्या भूमिकेमुळे काही प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात.
दरम्यान, फेडने स्पष्ट केले की, 'महागाईवर (Inflation) नियंत्रण आणण्यासाठी काही प्रमाणात मंदीचा फटका सहन करण्यास आम्ही तयार आहोत.' गुरुवारी, यूएस फेडने व्याजदर आणखी 75 बेसिस पॉईंटने वाढवला. याशिवाय, त्याच्या अद्ययावत आर्थिक अंदाजांनी मंद जीडीपी वाढ आणि उच्च चलनवाढ दर्शविली आहे. शिवाय, शुक्रवारी सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी दोन्ही सलग तिसऱ्या सत्रात घसरले. दुपारी 2:39 वाजता, सेन्सेक्स 1009.5 अंकांनी म्हणजेच 1.71 टक्क्यांनी घसरुन 58,110.22 वर स्थिरावला, तर निफ्टी (Nifty) 321.15 अंकांनी म्हणजेच 1.82 टक्क्यांनी घसरुन 17,308.65 स्थिरावला.
यूएस फेडची भूमिका: गुरुवारी, यूएस फेडने व्याजदर आणखी 75 बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. येत्या काही महिन्यांत आणखी मोठ्या व्याजदर वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यातच आता, आर्थिक विश्लेषक नोव्हेंबरमध्ये आणखी 75 bps, डिसेंबरमध्ये 50 bps आणि फेब्रुवारी 2023 मध्ये अंतिम 25 bps दरांमध्ये वाढ होईल असा अंदाज वर्तवत आहेत.
आरबीआयची भूमिका: देशातील व्यापारी वर्ग आता पुढील आरबीआयच्या धोरणाची, चलनाच्या सध्याच्या स्थितीची, त्याचबरोबर घटत्या गंगाजळीबद्दल चर्चा करु लागला आहे. दुसरीकडे, आर्थिक विश्लेषकांना आशा आहे की, RBI पूर्वीच्या 35bps च्या विरुद्ध 50bps दर वाढवेल. डिसेंबरच्या बैठकीत पूर्वीच्या 25bps वरुन 35bps वाढ करेल, FY23 च्या चौथ्या तिमाहीत कमोडिटीच्या किमती वाढल्यास आणखी महागाईचा धोका वाढू शकतो. RBI 2023 मध्ये पूर्वीच्या 75bp वरुन दर 50bps ने वाढवू शकते. जे एप्रिल 2023 पर्यंत रेपो दर 6.75% पर्यंत नेईल. RBI चे पुढील धोरण 28-30 सप्टेंबर रोजी असेल.
दुसरीकडे, आशियाई विकास बँकेने (ADB) भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी 2022-23 च्या वाढीचा अंदाज एप्रिलमध्ये अंदाजित 7.5% वरुन 7% केला आहे. फिच रेटिंग्सने भारदस्त चलनवाढ आणि उच्च व्याजदराचा हवाला देऊन, FY23 साठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 7.8% वरुन 7% पर्यंत कमी केला. तसेच पुढील आर्थिक वर्षाचा अंदाज 7.4% वरुन 6.7% पर्यंत कमी केला. मूडीजने 2022 साठी आपला वास्तविक वाढीचा अंदाज 8.8% च्या आधीच्या अंदाजावरुन 7.7% पर्यंत कमी केला आहे.
तसेच, Goldman Sachs ने आपला FY22 भारतासाठी वाढीचा अंदाज 7.6% वरुन 7% पर्यंत कमी केला. शिवाय, मॉर्गन स्टॅन्लेने सांगितले की, FY23 साठी 7.2% च्या वाढीच्या अंदाजापेक्षा 40 बेसिस पॉईंटचा धोका वर्तवला आहे. सिटीग्रुपने आपला FY23 वाढीचा अंदाज 8% वरुन 6.7% पर्यंत कमी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.