SBI bank new rule of ATM holder
SBI bank new rule of ATM holder Dainik Gomantak

SBI चा ATM वापरकर्त्यांसाठी नवा नियम

एटीएममधून पैसे काढण्याची पडताळणी किंवा प्रमाणीकरण करण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) रोख व्यवहारांबाबत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. हे अशा लोकांसाठी आहे जे एटीएममधून (ATM) 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढत आहेत. या नियमानुसार, जर तुम्ही 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढत असाल तर त्यासाठी तुम्हाला OTP ची मदत घ्यावी लागेल. पैसे काढताना ओटीपी सुरक्षित पद्धत आहे. (SBI bank new rule of ATM holder)

किंबहुना, बँकांच्या व्यवहारातील वाढती फसवणूक पाहता ही बाब लक्षात घेऊन अशा प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. स्टेट बँकेचे ग्राहक मुबलक प्रमाणात आहेत जे या OTP सुविधेचा लाभ घेऊ शकतील.स्टेट बँक आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी अशा सेवेची घोषणा करत असते जेणेकरून त्यांचे व्यवहार सुरक्षित आणि सुलभ व्हावेत. OTP द्वारे पैसे काढणे हा देखील त्याचाच एक भाग आहे. यासाठी बँकेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक तुमच्याकडे असला पाहिजे, ज्यावर OTP येईल. त्याच OTP द्वारे तुम्ही पैसे काढू शकाल.

काय आहेत नवे नियम

एटीएममधून पैसे काढण्याची पडताळणी किंवा प्रमाणीकरण करण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांच्या पैशाची सुरक्षा वाढते आणि पैसे चुकीच्या हातात जाण्यापासून रोखले जातात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की OTP आधारित रोख व्यवहार फक्त 10 हजारांपेक्षा जास्त रकमेसाठी आहेत. त्यापेक्षा कमी पैसे काढल्यास एटीएममध्ये ओटीपी टाकण्याची गरज भासणार नाही.

SBI आपल्या ग्राहकांना सोशल मीडियावर फसवणूक करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी अनेकदा प्रयत्नशील असते . गेल्या आठवड्यात आपल्या अलीकडील ट्विटमध्ये, SBI ने म्हटले आहे की, "SBI ATM मधील व्यवहारांसाठी आमची OTP आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली फसवणूक करणाऱ्यांविरूद्ध उपाय आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल."

SBI bank new rule of ATM holder
गॅसच्या दरात 100 रुपयांनी वाढ! महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका

बनावट किंवा अनधिकृत व्यवहारांची संख्या कमी करण्यासाठी 2020 मध्ये OTP आधारित ATM व्यवहार सुरू करण्यात आला. ओटीपी-आधारित रोख पैसे काढण्याची सुविधा सुरू केल्यामुळे, स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या एटीएम सेवेद्वारे रोख पैसे काढण्यासाठी सुरक्षिततेचे आणखी एक मोठे पॉल उचलले आहे. बँकेत नोंदणी केलेल्या ग्राहकाच्या मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल. हे अतिरिक्त पडताळणी घटक स्टेट बँकेच्या कार्डधारकाला इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे फसव्या एटीएममधून पैसे काढण्यापासून संरक्षण करते. ज्या ग्राहकाच्या फोनवर OTP येईल तोच ATM मधून पैसे काढू शकेल. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता नाहीशी नसेल.

स्टेट बँकेचे कार्डधारक इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढतो तेव्हा ही सुविधा लागू होणार नाही. कारण नॅशनल फायनान्शियल स्विच (NFS) मध्ये हे काम अद्याप सुरू झालेले नाही, असे एसबीआयने म्हटले आहे. NFS हे देशातील सर्वात मोठे इंटरऑपरेबल एटीएम नेटवर्क आहे आणि 95 टक्क्यांहून अधिक देशांतर्गत इंटरबँक एटीएम व्यवहार हाताळते.

कार्डधारकाने त्याला काढायची असलेली रक्कम टाकल्यानंतर, एटीएम स्क्रीन ओटीपी विंडो दर्शवते. व्यवहार पूर्ण करण्यासाठी, ग्राहकाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com