मुदतपूर्तीपूर्वी LIC बंद करायची असेल, तर भरावा लागेल कर..!

LIC पॉलिसी बंद करताना नेमक्या प्रकारच्या नियमांना सामोरे जावे लागते? जाणून घ्या हे नियम..
 Rules for closing LIC policy

Rules for closing LIC policy

Published on
Updated on

वाढत्या महागाई च्या काळात कधीकधी अशी परिस्थिती उद्भवते की गुंतवणूकदाराला पॉलिसी बंद करण्याचा विचार करावा लागतो. याची अनेक कारणे असू शकतात, पण तुम्हाला हे माहिती असले पाहिजे की LIC पॉलिसी (policy) बंद करताना नेमक्या प्रकारच्या नियमांना सामोरे जावे लागते? वास्तविक, पॉलिसी बंद केल्यावर, गुंतवणूकदाराला (investment) काही पैसे मिळतात ज्याला सरेंडर व्हॅल्यू म्हणतात.

<div class="paragraphs"><p> Rules for closing LIC policy </p></div>
फक्त 1 रुपयात 30 दिवसांचा पॅक, मिळेल इतका डेटा

तुमची पॉलिसी बंद करण्यापूर्वी तुम्हाला या काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे का की पॉलिसी बंद केल्यावर मिळालेले सरेंडर व्हॅल्यू देखील करपात्र आहे? आयटीआर भरताना सरेंडर व्हॅल्यू नमूद करता येईल का? किंवा, समर्पण मूल्याच्या आधारावर गुंतवणूकदाराकडून आयकर आकारला जाऊ शकतो का? LIC जीवन विमा पॉलिसी आयकर कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देते. तसेच, जर तुम्ही 31 मार्च 2003 पूर्वी पॉलिसी घेतली असेल, तर तुम्हाला भरलेल्या प्रीमियमवर 20 टक्क्यांपर्यंत कर सूट मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया..

LIC: जर तुम्हाला मुदतपूर्तीपूर्वी पॉलिसी बंद करायची असेल, तर हे नियम जाणून घ्या,

कमी कर भरावा लागेल

  1. पॉलिसी सरेंडर करण्यापूर्वी, तुमच्यासाठी सर्व नियमांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. साधारणपणे, पॉलिसींवर असा नियम आहे की जर पहिल्या दोन वर्षांत प्रीमियम पूर्ण भरला असेल, तर सरेंडर व्हॅल्यूवर कोणत्याही प्रकारचा कर लागणार नाही.

  2. 31 मार्च 2012 पूर्वी पॉलिसी घेतल्यास त्यावर कोणताही कर लागणार नाही. जर पॉलिसी 1 एप्रिल 2003 ते 31 मार्च 2012 दरम्यान घेतली असेल, तर विमा रक्कम वार्षिक प्रीमियमच्या 5 पट जास्त असेल तरच करात सूट मिळेल.

  3. त्याच क्रमाने, जर तुम्ही 1 एप्रिल 2012 नंतर पॉलिसी घेतली असेल, तर विमा रकमेची रक्कम योजनेच्या वार्षिक प्रीमियमच्या 10 पट जास्त असल्यास कर माफ होईल.

  4. तर, 1 एप्रिल 2003 ते 31 मार्च 2012 दरम्यान घेतलेल्या पॉलिसीमध्ये, कोणत्याही एका वर्षात भरलेल्या प्रीमियमची रक्कम विमा रकमेच्या 20% पेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला सरेंडर मूल्यावर कर भरावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com