Inflation: सर्वसामान्यांना दिलासा! देशभरातील महागाईत किंचित घट

Retail inflation: नुकत्याच जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई फेब्रुवारीमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत किरकोळ घसरून 5.09 टक्क्यांवर आली आहे.
Retail Inflation
Retail InflationDainik Gomantak

Retail inflation has declined slightly to 5.09 percent in February compared to the previous month:

महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. जानेवारीनंतर फेब्रुवारी महिन्यातही महागाईत काहीशी घट झाली आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई फेब्रुवारीमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत किरकोळ घसरून 5.09 टक्क्यांवर आली आहे.

ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित महागाई जानेवारीमध्ये 5.1 टक्के आणि फेब्रुवारी 2023 मध्ये 6.44 टक्के होती.

नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्न बास्केटमधील किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 8.66 टक्के होता, जो मागील महिन्यातील 8.3 टक्क्यांपेक्षा किंचित जास्त होता.

Retail Inflation
IPO किमतींसह शेअर्स खरेदी-विक्रीमध्येही घोळ, SEBI च्या प्रमुखांचा गुंतवणुकदारांना इशारा

किरकोळ महागाई दर दोन्ही बाजूंनी 2 टक्क्यांच्या फरकाने 4 टक्क्यांवर राहील याची खात्री करण्याचे काम सरकारने रिझर्व्ह बँकेकडे सोपवले आहे. गेल्या महिन्यात मध्यवर्ती बँकेने CPI महागाई दर 5 वर राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

जानेवारी 2024 मध्ये भारताचे औद्योगिक उत्पादन 3.8 टक्क्यांनी वाढले आहे जाहीर. झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

औद्योगिक उत्पादन, औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) द्वारे मोजलेले, जानेवारी 2023 मध्ये 5.8 टक्क्यांनी वाढले होते.

Retail Inflation
Flights To Goa: एका शहरातून बंद तर दुसऱ्या शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरु होणार, वाचा सविस्तर

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक जानेवारी 2024 मध्ये 3.8 टक्क्यांनी वाढला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2024 मध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन 3.2 टक्क्यांनी वाढले होते, जे एका वर्षापूर्वी याच महिन्यात 4.5 टक्क्यांनी वाढले होते. समीक्षाधीन कालावधीत, खाण उत्पादनाची वाढ ५.९ टक्के आणि वीज उत्पादनाची वाढ ५.६ टक्के होती.

IIP चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी दरम्यान 5.9 टक्क्यांनी वाढला, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 5.5 टक्के होता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com