Ram Mandir: कॅनडाचा मोठा निर्णय; 22 जानेवारी दिवस "अयोध्या राम मंदिर दिन" म्हणून साजरा करणार!

Ram Mandir: अयोध्येतील श्री राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी कॅनडाने मोठा निर्णय घेऊन सर्वांना चकित केले आहे.
Ram Mandir Ayodhya
Ram Mandir AyodhyaDainik Gomantak

Ram Mandir: अयोध्येतील श्री राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी कॅनडाने मोठा निर्णय घेऊन सर्वांना चकित केले आहे. भारतासोबत सुरु असलेल्या राजनैतिक तणावादरम्यान कॅनडाने राम मंदिरावर घेतलेल्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरे तर, कॅनडाच्या तीन नगरपालिकांनी 22 जानेवारी हा दिवस "अयोध्या राम मंदिर दिन" म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशातील अयोध्येत 22 जानेवारीला श्री रामाच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी हिंदू कॅनेडियन फाऊंडेशनने ग्रेटर टोरंटो परिसरात होर्डिंगही लावले आहेत. भारतातील राम मंदिरात 22 जानेवारीला श्री राम मंदिराचा अभिषेक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मान्यता देत कॅनडाच्या तीन नगरपालिकांनी सोमवारी ही घोषणा केली आहे. हिंदू कॅनेडियन फाऊंडेशन (HCF) चे संस्थापक आणि अध्यक्ष अरुणेश गिरी यांनी सांगितले की, ब्रॅम्प्टन, ओकविले आणि ब्रँटफोर्ड यांनी विश्व जैन संघटना कॅनडा (VJSC) सोबत 22 जानेवारी हा दिवस "अयोध्या राम मंदिर दिवस" ​​म्हणून घोषित केला आहे. मिल्टनच्या महापौरांकडून अभिनंदनाचा संदेशही पाठवण्यात आला आहे. ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी जारी केलेल्या घोषणेमध्ये म्हटले की, "उत्सव दिवस" हा ​​या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व ओळखण्याची समुदायासाठी एक संधी म्हणून काम करेल. गिरी म्हणाले की, कॅनडामध्ये लावण्यात आलेले होर्डिंग सेलिब्रेटरी सेल्फी म्हणून म्हणून काम करत आहेत आणि उत्सवाचा उत्साहही वाढवत आहेत.

Ram Mandir Ayodhya
Canada बाबत भारतीयांचा भ्रमनिरास, एकाच वर्षात एवढ्या टक्क्यांनी घटली विद्यार्थी संख्या; खलिस्तान मुद्याने वाढवले अंतर

व्हीजेएससीचे अध्यक्ष विजय जैन म्हणाले की, "जगभरातील सर्व धार्मिक लोकांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. विशेष म्हणजे, ते हा क्षण दिवाळीसारखा साजरा करत आहेत. श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या व्यापक प्रचारासाठी आज एक कार रॅली कॅनडामध्ये काढली जात आहेत.'' गिरी म्हणाले की, ''रॅलीचे मुख्य आकर्षण 20 फूट लांबीचा डिजिटल ट्रक असेल. रविवारी ओटावा, विंडसर, ओंटारियो आणि सरे, ब्रिटिश कोलंबिया येथे आणखी तीन रॅली होणार आहेत. कॅलगरीमधील हिंदू समुदाय अल्बर्टा शहरात 'रामोत्सव' म्हणून अभिषेक सोहळा साजरा करत आहे.''

Ram Mandir Ayodhya
Canada: भारतीय विद्यार्थ्यांना मोठा झटका! कॅनडामध्ये शिक्षण महागलं; ट्रूडो सरकारने दुप्पट केला स्टुडंट फंड

''विश्व हिंदू परिषद कॅनडा अनेक आठवड्यांपासून देशभरातील मंदिरांशी सहयोग करत आहे. कॅनडामध्ये आठवड्याच्या शेवटी आणि सोमवारपर्यंत अशा 115 हून अधिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. देशभरातील मंदिरांसोबत त्यांच्या योजना समजून घेण्यासाठी आणि त्यांना हा 'आनंदोत्सव' साजरा करता यावा साठी काम करत आहे,” असे VHP कॅनडाचे मनीष पुरी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com