IPO किमतींसह शेअर्स खरेदी-विक्रीमध्येही घोळ, SEBI च्या प्रमुखांचा गुंतवणुकदारांना इशारा

SEBI Warning: गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी SEBI चे पहिले पाऊल म्हणजे SME विभागामध्ये SSM आणि GSM फ्रेमवर्क लागू करणे, जे सध्या SME विभागात लागू नाही.
Manipulation In IPO And Share Trading
Manipulation In IPO And Share TradingDainik Gomantak

Manipulation In IPO And Share Trading Warns SEBI:

SEBI च्या प्रमुख माधवी पुरी बुच यांनी नुकतेच सांगितले की, त्यांना Small and Medium Enterprises (SME) विभागातील शेअरच्या किमतीत अनियमिततेचे संकेत मिळाले आहेत.

ही त्रुटी आयपीओच्या किमतीत तसेच शेअर्सच्या ट्रेडिंगमध्येही झाली आहे. याबाबत त्यांनी गुंतवणूकदारांना सावध केले आहे.

बुच म्हणाल्या की, आम्हाला एसएमई विभागातील शेअर्सच्या किमतींमध्ये अनियमिततेचे काही संकेत मिळाले आहेत. ते शोधण्याचे तंत्रज्ञान आमच्याकडे आहे. यातील काही नमुने आपण पाहत आहोत.

सेबी आयपीओ आणि शेअरच्या किमतीतील अनियमिततेचे पुरावेही गोळा करत आहे. मात्र, इनपुट मिळाल्यानंतरही कारवाई न होण्याचे कारण म्हणजे नियामकाकडून प्रकरण अधिक भक्कम करायचे आहे, असे वृत्त पीटीआयने दिले.

Manipulation In IPO And Share Trading
Russia-Ukraine: लेकासाठी बाप व्याकूळ! युद्धात मृत्यू झालेल्या मुलाचे पार्थिव आणण्यासाठी कुटुंबीय रशियाला रवाना

बुच पुढे म्हणाल्या की, सेबी सल्लागारांशी सल्लामसलत करून डेटाच्या सर्व पैलूंचे मूल्यांकन करत आहेत. जर आम्हाला काही फसवणूक आढळली तर आमची पुढची पायरी म्हणजे त्याबद्दल जनतेला सावध करणे.

त्यांनी पुढे हे देखील सांगितले की, गुंतवणूकदारांना हे समजून घेणे आवश्यक आहे की SME विभाग हा मुख्य प्रवाहातील बाजारापेक्षा खूप वेगळा आहे. सेबीने गुंतवणूकदारांना जाहीर केलेल्या नियमांच्या संदर्भात हे अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे.

Manipulation In IPO And Share Trading
धक्कादायक! उदरनिर्वाहासाठी पत्नीनं मागितली पोटगी; पतीनं कोर्टात सांगितलं आपलं खरं रुप

गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी SEBI चे पहिले पाऊल म्हणजे SME विभागामध्ये SSM आणि GSM फ्रेमवर्क लागू करणे, जे सध्या SME विभागात लागू नाही. ते म्हणाले की, आता एसएमई आयपीओमध्ये आरआयसीशी संबंधित अनेक खुलासे द्यावे लागतील.

गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात SME IPO आले आहेत, त्यापैकी अनेक IPO इश्यू किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त सूचिबद्ध झाले आहेत आणि शेअर्समध्येही असेच काहीसे दिसून आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com