50 रुपयांची ट्रिक Rapido ला पडली महागात; भ्रामक जाहिरातींमुळे ठोठावला 10 लाखांचा दंड

Rapido Fined 10 Lakh By CCPA: आजच्या डिजिटल युगात कमी अंतराच्या प्रवासासाठी बाइक आणि टॅक्सी सेवा देणाऱ्या ॲप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
Rapido Fined 10 Lakh By CCPA
RapidoDainik Gomantak
Published on
Updated on

Rapido Fined 10 Lakh By CCPA: आजच्या डिजिटल युगात कमी अंतराच्या प्रवासासाठी बाइक आणि टॅक्सी सेवा देणाऱ्या ॲप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यापैकीच एक लोकप्रिय नाव म्हणजे Rapido. पण आता याच कंपनीला भ्रामक जाहिराती दाखवणे महागात पडले आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (Central Consumer Protection Authority) या प्रकरणी Rapido ला 10 लाखांचा दंड ठोठावला. ग्राहकांना खोटी आश्वासने आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला.

‘5 मिनिटांत ऑटो’ आणि ‘50 रुपये कॅशबॅक’चे खोटे दावे

Rapido ने आपले ग्राहक वाढवण्यासाठी अनेक आकर्षक जाहिराती चालवल्या. यामध्ये ‘5 मिनिटांत ऑटो’, ‘गॅरंटीड ऑटो’ आणि ‘50 कॅशबॅक’ असे आकर्षक दावे करण्यात आले. या जाहिराती पाहून अनेक ग्राहक सेवा वापरण्यासाठी उत्सुक झाले, पण प्रत्यक्षात त्यांना कोणताही फायदा झाला नाही. जे दावे जाहिरातींमध्ये करण्यात आले, ते प्रत्यक्षात पूर्ण झाले नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. याच तक्रारींची गंभीर दखल घेत CCPA ने ही कारवाई केली.

Rapido Fined 10 Lakh By CCPA
PM Kisan 20th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; असा तपासा बॅलन्स

कॅशबॅकच्या नावावर फसवणूक

दरम्यान, या प्रकरणात सर्वात मोठी गडबड 50 रुपये कॅशबॅक ऑफरबाबत समोर आली. जाहिरातीत हे पैसे थेट परत मिळतील असे सांगण्यात आले, परंतु प्रत्यक्षात कंपनी ग्राहकांना केवळ ‘कॉइन्स’ (Coins) देत होती. हे कॉइन्स फक्त पुढील राइडसाठी वापरता येत होते आणि त्यांची वैधताही फक्त सात दिवसांची होती. त्यामुळे ग्राहकांना 50 रुपयांचा पूर्ण लाभ मिळतच नव्हता. ही ग्राहकांची सरळसरळ फसवणूक आहे, असे CCPA ने म्हटले.

जून 2024 पासून कंपनीविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्यापैकी अर्ध्याहून अधिक तक्रारींवर अद्यापही तोडगा निघालेला नाही. यूजर्संनी आरोप केला की, Rapido वेळेवर राइड उपलब्ध करुन देत नाही, आश्वासनानुसार कॅशबॅक देत नाही आणि अनेकदा चालकांचे वर्तनही असभ्य असते. रिफंड न मिळण्याच्या तक्रारींची संख्याही मोठी आहे.

Rapido Fined 10 Lakh By CCPA
PM Kisan 20th installment: PM किसान योजनेच्या 20वा हप्त्याची तारीख जाहीर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार पैसे

CCPA चे कठोर निर्देश

तसेच, या सर्व बाबी लक्षात घेऊन CCPA ने Rapido ला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला. प्राधिकरणाने कंपनीला सर्व प्रभावित ग्राहकांना मूळ 50 रुपयांचा कॅशबॅक परत देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, दिशाभूल करणाऱ्या सर्व जाहिराती तात्काळ थांबवण्याचे आणि 15 दिवसांच्या आत अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

हा निर्णय कंपन्यांसाठी एक मोठा इशारा मानला जात आहे. यापुढे कंपन्यांना खोटे दावे आणि अपूर्ण आश्वासनांनी ग्राहकांना फसवणे महागात पडू शकते, असा स्पष्ट संदेश CCPA ने दिला आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी नियामक संस्था किती गंभीर आहेत, हे या कारवाईतून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com