PM Kisan Scheme: 10 व्या हप्त्याच्या प्रक्रियेत झालेत नवे बदल

पंतप्रधान किसान योजनेत आता आधार कार्ड असणे , धारणा मर्यादा संपुष्टात येणे, स्व-नोंदणी करणे इत्यादी महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
PM Kisan Scheme: 10 व्या हप्त्याच्या प्रक्रियेत झालेत नवे बदल
PM Kisan Scheme: 10 व्या हप्त्याच्या प्रक्रियेत झालेत नवे बदल Dainik Gomantak
Published on
Updated on

देशात कुठे गव्हाची पेरणी सुरू असतांना त्यात खत-पाणी देण्याची वेळ आली आहे. तर आता ऊस तोडण्याची कामे सुरू झाले आहे. यामुळे 12 कोटींहून अधिक शेतकरी (Farmers) पीएम किसानच्या (PM- Kisan) 2000 रुपयांच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण ही रक्कम त्यांच्यासाठी खूप महत्वाची असते. पण शेतकऱ्यांना आता जास्त वाट पहावी लागणार नाही, कारण येत्या 15 डिसेंबरला ही रक्कम मिळू शकते.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफार (Transfer) करण्यासाठी राज्य सरकारांनी RFT वर स्वाक्षरी केली आहे. तसेच लवकरच FTO देखील तयार होईल. हे काम पूर्ण होताच मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे (Money) ट्रान्सफार करेल. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार दरवर्षी तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात 6000 रुपये ट्रान्सफार करते. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांना 2000- 2000 रुपयांचे 9 हप्ते दिले आहेत.24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झालेली

PM Kisan Scheme: 10 व्या हप्त्याच्या प्रक्रियेत झालेत नवे बदल
पेट्रोल-डिझेल पुन्हा भडकले; पहा आजच्या किंमती

पंतप्रधान किसान योजना 1 डिसेंबर 2018 पासून प्रभावित झाली आहे. योजनेच्या स्थापनेनुसार अनेक बदल करण्यात आले आहेत. जसे की अनिवार्य आधार कार्ड, धारणा मर्यादा संपुष्टात येणे, स्व-नोंदणी इत्यादी योजना झाल्यापासूनचे महत्वाचे बदल जाणून घेवूया.

*धारणा मर्यादा संपुष्टात येणे

ज्या शेतकऱ्यांकडे 2 किंवा 5 हेक्टर शेती होती त्यांनाच या योजनेचा सुरुवातीला लाभ मिळत होता. पण आता 14.5 कोटी शेतकऱ्यांचा त्याचा लाभ मिळवा यासाठी मोदी सरकारने ही सक्ती दूर केली आहे.

*आधार कार्ड अनिवार्य

आधार कार्डशिवाय पीएम किसान योजनेचा (PM Kisan Scheme) लाभ घेता येत नाही. सरकारने लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य केले आहे.

*स्व-नोंदणी करण्याची सुविधा

पीम किसान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी मोदी सरकारने लेखापाल, कानूनगो आणि कृषी अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारण्याची सक्ती संपवली आहे. आता शेतकरी घरी बसून या योजनेसाठी नोंदणी करू शकतात. तुमच्याकडे आधार कार्ड(Aadhar Card) , मोबाइल नंबर (Mobile Number) आणि बँक खाते (Bank Account Number) क्रमांक असल्यास, pmkisan. nic. in वर फामर्स कॉर्नरवर क्लिक करून स्वत:ची नोंदणी करावी.

* स्टेटस जाणून घेवू शकतो

सरकारने आणखी एक मोठा बदल केला आहे की नोंदणी (Registration) केल्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस स्वत: तपासू शकता. जसे की तुमच्या अर्जाची स्थीती काय आहे, तुमच्या बँक खात्यात (Bank Account) किती हप्ता जमा झाला आहे इत्यादि पण आता पीएम किसान पोर्टलला भेट देवून कोणताही शेतकरी त्याचा आधार क्रमांक, मोबाईल किंवा बँक खाते नंबर टाकून स्टेटस पाहू शकतो.

* किसान क्रीडट कार्ड

आता किसान क्रेडिट कार्ड (KCC) देखील पीएम किसान योजनेशी जोडले गेले आहे. पीएम किसणच्या लाभार्थ्यांना किसान क्रीडट कार्ड बनवणे सोपे झाले आहे. शेतकऱ्यांना किसान क्रीडट कार्डवर (Kisan Credit Card) 4 टक्के दराने 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

* मानधन योजनेचे फायदे

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्रे देण्याची गरज नाही. या योजनेअंतर्गत शेतकरी पीएम-किसान योजनेतून (PM Kisan Scheme) मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com