Government Scheme: मोदी सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांना मिळणार गूड न्यूज, 'या' मोठ्या योजनेचा...

PM Kisan Scheme: जुलै महिन्यात मोदी सरकार देशवासीयांच्या खात्यात 2000 रुपये पाठवणार आहे. त्यामुळे देशातील जनतेलाही मोठा दिलासा मिळणार आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

PM Kisan: देशातील तमाम शेतकऱ्यांना जुलै महिन्यात आनंदाची बातमी मिळणार आहे. प्रत्यक्षात जुलै महिन्यात मोदी सरकार देशवासीयांच्या खात्यात 2000 रुपये पाठवणार आहे. त्यामुळे देशातील जनतेलाही मोठा दिलासा मिळणार आहे.

हे 2000 रुपये मोदी सरकार त्या लोकांना पाठवणार आहेत जे पीएम किसान योजनेशी संबंधित आहेत. हे 2000 रुपये पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यात पाठवले जातील.

पीएम किसान योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना लवकरच केंद्राकडून 2,000 रुपयांचा हप्ता मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान लाभार्थ्यांना रुपये देणार आहेत.

PM किसान योजनेचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला. पीएम किसान योजना ही खासकरुन शेतकऱ्यांसाठी (Farmer) चालवली जाणारी योजना आहे. देशातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Prime Minister Narendra Modi
Central Government Scheme For Farmers: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आजपासून आणखी एक नवीन योजना सुरु, करोडो लोकांना होणार फायदा!

पीएम किसानचा 14 वा हप्ता

पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता मोदी सरकार जारी करणार आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत ट्विटर हँडलनुसार, सरकार 27 जुलै 2023 रोजी राजस्थानमधील सीकरमध्ये 14 वा हप्ता जारी करेल.

योजनेंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा प्रति हप्ता 2,000 रुपये म्हणजेच वार्षिक 6,000 रुपये मिळतात. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक (Bank) खात्यात जमा केली जाते.

Prime Minister Narendra Modi
Government Scheme: खूशखबर! सरकारने केली 'ही' मोठी घोषणा; आता 31 मार्च 2024 पर्यंत मिळणार...!

eKYC आवश्यक आहे

त्याचवेळी, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता मिळविण्यासाठी eKYC अनिवार्य करण्यात आले आहे. 13 वा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.

परंतु पारदर्शकतेसाठी, विभागाने सर्व शेतकऱ्यांना त्यांचे eKYC करण्यास सांगितले आहे. ही योजना 2019 मध्ये सुरु करण्यात आली आणि तेव्हापासून लाखो शेतकरी संबंधित विभागाकडून हप्ते मिळवून या योजनेचा लाभ घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com