Twitter vs Instagram: टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतले. त्यानंतर मस्क यांनी ट्विटर सबस्क्रिप्शन आधारित बनवले आहे.
ब्लू टिकसाठी पैसै मोजावे लागत असल्याने ट्विटरवरचे अनेक यूजर्स नाराज आहेत. अशात आता ट्विटरला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्राम नवे टेक्स्ट बेस्ड अॅप घेऊन येत आहे. हे ट्विटरसारखे असेल. परंतु यूजर्ससाठी ते पूर्णपणे विनामूल्य असेल.
दरम्यान, पेड सबस्क्रिप्शन सुरु झाल्यापासून ट्विटरचे अनेक यूजर्स नाराज आहेत. तसेच अनेक यूजर्सनी ट्विटर वापर बंद केला आहे.
अशा परिस्थितीत ते ट्विटरसारखा दुसरा पर्याय शोधत होता. पण आता इन्स्टाग्राम त्या यूजर्सची इच्छा पूर्ण करणार आहे.
ट्विटरच्या (Twitter) बदललेल्या पॉलिसीनंतर ट्विटरसारख्या इतर सोशल मीडिया अॅप्सची मागणी वाढली आहे, जसे की मास्टोडॉन आणि ब्लूस्की.
हे सर्व प्लॅटफॉर्म ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी सुरु केले आहेत. आता या शर्यतीत फेसबुकची मूळ कंपनी मेटाने उडी घेतली आहे.
मेटा आपल्या या नव्या अॅपची सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींसह चाचणी करत आहे. हे नवीन अॅप येत्या काही महिन्यांत निवडक निर्मात्यांना उपलब्ध करून दिले जाईल.
नवीन अॅप इंस्टाग्राम अॅपपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. पण जर यूजर्सना हवे असेल तर ते त्यासोबत त्यांचे इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंट अटॅच करू शकतील. इंस्टाग्रामचे नवीन अॅप यावर्षी जूनमध्ये लॉन्च होऊ शकते.
या अॅपचे नाव अद्याप समोर आलेले नाही. पण काही तपशील नक्कीच लीक झाले आहेत. त्यानुसार अॅपचा इंटरफेस इन्स्टाग्रामसारखाच असेल.
फोटो आणि व्हिडिओंच्या फीडऐवजी, अॅपच्या होममध्ये "टेक्स्ट-आधारित" पोस्टची टाइमलाइन वैशिष्ट्यीकृत असेल.
ट्विटरप्रमाणेच फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्याची सुविधा असेल. हे अॅप युजर्सना पोस्टमध्ये फोटो, व्हिडिओ आणि लिंक्स संलग्न करण्याची परवानगी देईल.
प्लॅटफॉर्म इतर युजर्सना या पोस्ट्सना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि थ्रेड तयार करण्यास परवाणगी देईल. युजर्सना नवीन अॅपवर आणणे सोपे करण्यासाठी मेटा योजना आखत आहे.
अॅपच्या यूजर्सना एका टॅपने इन्स्टाग्रामवर आधीपासूनच फॉलो केलेल्या खात्यांना फॉलो करण्याचा पर्याय देखील असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.