Pension News: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, सरकारने वाढवली पेन्शन! आता या लोकांना...

Central Government: केंद्र सरकारकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शन मिळण्याचा पर्याय दिला जातो. आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळण्याची संधी आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Pension News Update: नोकरदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही नोकरी करत असाल आणि आणखी पेन्शन (Pension News) मिळवू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे.

केंद्र सरकारकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शन मिळण्याचा पर्याय दिला जातो. आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळण्याची संधी आहे.

त्याकरिता अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक महिना शिल्लक आहे. होय... तुम्ही 3 मे पर्यंत अर्ज न केल्यास तुम्हाला वाढीव पेन्शन मिळणार नाही.

सरकारने तारीख वाढवली आहे

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने सांगितले आहे की, अधिक पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही 3 मे 2023 पर्यंत अर्ज करु शकता. ईपीएफओने अर्जाची तारीख वाढवली आहे. यापूर्वी यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च होती, मात्र आता सरकारने (Government) ती दोन महिन्यांसाठी वाढवली आहे.

PM Narendra Modi
Pension New Rules: क्या बात है...! होळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी गूडन्यूज, सरकार पेन्शन अन् पगार वाढवणार!

EPFO कडून माहिती मिळाली

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य त्यांच्या नियोक्त्यांसोबत 3 मे 2023 पर्यंत उच्च निवृत्ती वेतनासाठी संयुक्तपणे अर्ज करु शकतील. त्यांना यासाठी रिटायरमेंट फंड ऑर्गनायझेशनच्या एकात्मिक सदस्य पोर्टलवर अर्ज करावा लागेल.

पूर्वी असे मानले जात होते की, 3 मार्च 2023 ही उच्च पेन्शन निवडण्याची अंतिम तारीख होती. EPFO च्या युनिफाइड मेंबर पोर्टलवर अलीकडेच सक्रिय केलेली URL स्पष्टपणे दर्शवते की, उच्च पेन्शन निवडण्याची अंतिम तारीख 3 मे 2023 आहे.

न्यायालयानेही आदेश दिले आहेत

याआधी, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 4 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या आदेशात म्हटले होते की, EPFO ​​ला सर्व पात्र सदस्यांना उच्च निवृत्ती वेतनाची निवड करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी द्यावा लागेल. हा चार महिन्यांचा कालावधी 3 मार्च रोजी संपेल. यावरुन याची अंतिम मुदत 3 मार्च 2023 असल्याचे समजले.

PM Narendra Modi
Pension News: पेन्शनधारक सुखावले, आता मिळणार 50 टक्के जास्त पेन्शन; सरकारने काढला आदेश!

2014 मध्ये पेन्शनमध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती

गेल्या आठवड्यात EPFO ​​ने आपल्या प्रक्रियेचा तपशील जारी केला. असे सांगण्यात आले की, भागधारक आणि त्यांचे नियोक्ते संयुक्तपणे कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करु शकतात. नोव्हेंबर 2022 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन योजना, 2014 वर शिक्कामोर्तब केले.

PM Narendra Modi
Pension Of Ex MP: 4796 माजी खासदारांच्या पेन्शनवर सवाल, 70 कोटींचा खर्च रोखण्याची अर्थमंत्र्यांकडे मागणी

यापूर्वी, 22 ऑगस्ट 2014 च्या EPS सुधारणेने पेन्शनपात्र वेतन मर्यादा 6,500 रुपये प्रति महिना वरुन 15,000 रुपये प्रति महिना केली होती. तसेच, सदस्य आणि त्यांच्या नियोक्त्यांना त्यांच्या वास्तविक पगाराच्या 8.33 टक्के EPS मध्ये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com