Maruti Victoris Launched: मायलेज, सेफ्टी आणि फीचर्सचा परफेक्ट कॉम्बिनेशन, मारुती सुझुकीने लाँच केली SUV 'व्हिक्टोरिस'

Maruti Victoris Car: मायलेज, सेफ्टी आणि फीचर्सचा परफेक्ट कॉम्बिनेशन, मारुती सुझुकीने लाँच केली SUV ‘व्हिक्टोरिस’मारुती सुझुकीने भारतीय बाजारात आपली नवी दमदार एसयूव्ही "व्हिक्टोरिस" लाँच केली आहे.
Maruti Victoris Launched
Maruti Victoris LaunchedDainik Gomantak
Published on
Updated on

मारुती सुझुकीने भारतीय बाजारात आपली नवी दमदार एसयूव्ही "व्हिक्टोरिस" लाँच केली आहे. ही एसयूव्ही सेफ्टी, मायलेज आणि फीचर्सच्या बाबतीत ग्राहकांना आकर्षित करेल, अशी कंपनीची अपेक्षा आहे. भारत एनसीएपी आणि ग्लोबल एनसीएपी या दोन्ही आंतरराष्ट्रीय मानांकनांमध्ये तिला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाल्याने, ही एसयूव्ही कुटुंबांसाठी सुरक्षित पर्याय मानली जात आहे.

मारुतीने ही एसयूव्ही एकूण ६ व्हेरियंटमध्ये बाजारात आणली आहे. प्रत्येक व्हेरियंटमध्ये ६ एअरबॅग्ज देण्यात आले असून, सुरक्षेवर कंपनीने मोठा भर दिला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या मॉडेलमध्ये १० रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. तिची सुरुवातीची किंमत १०.५० लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे.

Maruti Victoris Launched
North Goa: सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांची खैर नाही! 66 जण ताब्यात; उत्तर गोव्यात पोलिसांची मोठी कारवाई

प्रीमियम डिझाइन आणि इंटीरियर

बाह्य लूककडे पाहिले तर, व्हिक्टोरिस खूपच बोल्ड आणि स्पोर्टी वाटते. १७-इंचांचे ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि आकर्षक एलईडी डीआरएल्समुळे ती रस्त्यावर उठून दिसते.
इंटीरियरच्या बाबतीत, ही कार प्रीमियम सेगमेंटशी स्पर्धा करते. यात मोठे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डॉल्बी अ‍ॅटमॉस म्युझिक सिस्टम, तसेच लेव्हल-२ एडीएएस (ADAS) फीचर दिले आहे, जे या सेगमेंटमध्ये महत्त्वाचे ठरतात.

Maruti Victoris Launched
Goa Politics: खरी कुजबुज; समुद्रकिनारे स्वच्छ होणार कधी?

मायलेज आणि इंजिन पर्याय

ग्राहकांसाठी सर्वात मोठा आकर्षणबिंदू म्हणजे तिचा जोरदार मायलेज. कंपनीने दावा केला आहे की ही एसयूव्ही २८.६५ किमी प्रति लिटर इतके मायलेज देते, ज्यामुळे ती आपल्या वर्गातील सर्वात इंधन कार्यक्षम एसयूव्ही ठरते.

तिच्यात १.५ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. गिअरबॉक्सच्या बाबतीत, ग्राहकांना ५-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड ऑटोमॅटिक, तसेच ई-सीव्हीटीचे पर्याय मिळतात.

स्पर्धा कोणाशी?

व्हिक्टोरिस भारतीय बाजारातील लोकप्रिय मिड-साईज एसयूव्हींशी थेट स्पर्धा करणार आहे. यात होंडा एलिव्हेट, ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, एमजी अ‍ॅस्टर, टाटा हॅरियर आणि स्कोडा कुशक यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com