Maruti Suzuki Alto: 3 लाखात मिळणाऱ्या कारचे टॅक्समुळे बिघडते गणित? जाणून घ्या किती लागतो कर

Maruti Suzuki Alto: चार लाखापेक्षा कमी किमतींत ही गाडी विकत घेता येते.
Maruti Suzuki Alto
Maruti Suzuki AltoDainik Gomantak
Published on
Updated on

Maruti Suzuki Alto: आपल्यापैकी अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न असते. मात्र दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई मध्यमवर्गीयांना गाड्यांच्या किंमतीबद्दल विचार करायला भाग पाडत आहे.

भारतातील मध्यमवर्गीयांच्या घरात आजही मारुती सुजुकी अल्टोला प्राधान्य दिले जाते. महत्वाचे म्हणजे, छोटया शहरात मारुती सुजुकी अल्टोला मोठी मागणी आहे. या गाडीचे मेटेंनन्स अत्यंत कमी असल्याने या कारला महत्व आहे. चार लाखापेक्षा कमी किमतींत ही गाडी विकत घेता येते.

मात्र तुम्हाला माहीती आहे का ही चार पाच लाख किंमतीचा कार घेताना किती टॅक्स भरावा लागतो?

रस्ते आणि वाहतुक मंत्रालयाने निर्धारित केलेल्या नियमांनुसार, वाहनांच्या आकारानुसार तुम्हाला कर भरावा लागतो. म्हणजेच तुमची कार आकाराने जितकी मोठी तितका जास्त कर तुम्हाला भरावा लागतो. लक्झरी कारवर ५० टक्के कर वसूल केला जातो.

मारुती सुजुकी ऑल्टोवर लागतो एक लाखापेक्षा जास्त कर

दिल्लीमध्ये मारुती सुजुकी ऑल्टोची एक्स शोरुम किंमत 3,54,000 इतकी आहे. या कारवर २८ टक्के जीएसटी कर लागतो आणि १ टक्के Compensation Cess लागतो. त्यामुळे एकूण २९ टक्के टॅक्स भरावा लागतो.

या कारवर 38,718.75 रुपये CGST आणि 38,718.75 रुपये SGCT/UTGST म्हणून आकारले जातात. हे वजा केल्यावर म्हणजेच टॅक्सशिवाय मारुती सुझुकी अल्टोची किंमत रु. 2,76,562.50 होते.

आरटीओच्या नियमांनुसार, कार खरेदी करणाऱ्याला नोंदणीचेदेखील पैसे भरावे लागतात. मारुती सुझुकी अल्टो बेस मॉडेलवर नोंदणी शुल्क म्हणून 14,990 रुपये आकारले जातात. याशिवाय विम्यासाठी 20,683 रुपए भरावे लागतात. याशिवाय 3,385 रुपए इतर शुल्क म्हणून भरावे लागतात.

आपण जर मारुती सुझुकी अल्टो कारच्या किंमतीतून विमा किंमत आणि कर कमी केला तर या गाडीची ऑन रोड किंमत 3,93,058 रुपए इतकी होते. त्यावर टॅक्स, आरटीओ, आणि विम्यासाठी 1,19,253 भरावे लागतात. याचाच अर्थ असा की अल्टो कारच्या किंमतीत ४० टक्के ज्यादा बाकीच्या खर्चाशी निगडीत असतात, जो ग्राहकांना भरावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com