कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण नकोय? मग लक्षात ठेवा या गोष्टी ..

क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा..
Credit score सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा..
Credit score सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा.. Dainik Gomantak
Published on
Updated on

आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागते. कर्ज घेताना तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit score) बँकेकडून निश्चितपणे तपासला जातो. साधारणपणे 750 किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. बँका (Bank) अशा क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तींना उच्च क्रेडिटची व्यक्ती मानतात. यासोबतच अशा लोकांना कर्ज आणि क्रेडिट कार्डसारख्या सुविधाही अगदी सहज मिळतात.

Credit score सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा..
जीएसटी संकलनाच्या आकडयात लक्षणीय वाढ

गेल्या काही दिवसांमध्ये, अनेक बँकांनी त्यांच्या कर्ज अर्जदारांसाठी व्याजदर ठरवताना त्यांच्या जोखीमेचा भाग म्हणून क्रेडिट स्कोअर जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे, जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना कमी व्याजदराने कर्ज मिळण्याची अधिक शक्यता असते. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुम्ही त्यात सुधारणा करू शकता.

कर्जाची रक्कम वेळेत भरा

क्रेडिट स्कोअरचा हिशेब करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सर्व पात्रता निकषांपैकी, सर्वात महत्वाचे म्हणजे कर्ज आणि क्रेडिट कार्डची देय रक्कम वेळेवर भरणे. त्यामुळे, क्रेडिट कार्डची थकबाकी आणि ईएमआय वेळेवर भरून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर सुधारू शकता.

क्रेडिट वापराचे प्रमाण

क्रेडिट युटिलायझेशन रेशो हे एखाद्या व्यक्तीने घेतलेल्या एकूण कर्ज मर्यादेचे प्रमाण असते. 30 टक्क्यांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण यापेक्षा जास्त असल्याने, असे दिसते की त्या व्यक्तीला खूप जास्त क्रेडिट घ्यायचे आहे आणि त्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होण्याची शक्यता आहे.

Credit score सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा..
आता भारतात लवकरच 5G येणार, केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

क्रेडिट कार्डची शिल्लक पूर्ण भरा

तुम्ही बहुतेक ठिकाणी पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची शिल्लक वेळेवर भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारेल आणि तुमच्या पेमेंटवर कोणतेही व्याज लागणार नाही. तुम्ही क्रेडिट कार्डची देय रक्कम एकाच वेळी भरण्यास सक्षम नसल्यास, तुम्ही किमान देय रकमेपेक्षा जास्त रक्कम भरली आहे याची खात्री करावी.

एकाधिक कर्जे आणि क्रेडिट कार्ड घेणे टाळा

तुम्ही विविध प्रकारची कर्जे आणि क्रेडिट कार्ड घेणे देखील टाळले पाहिजे, कारण या प्रकारच्या फायनान्समुळे तुमच्यावर ईएमआयचा बोजा पडतो, ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअरही खराब होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com