स्टॉक मार्केटच्या अस्थिरतेमुळे एलआयसी आयपीओ लांबणीवर

LIC IPO मार्चमध्ये आणण्याचा निर्णय पुढे ढकलला जाऊ शकतो आणि तो 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात आणला जाऊ शकतो.
LIC IPO
LIC IPODainik Gomantak
Published on
Updated on

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चा IPO पुढील आर्थिक वर्ष 2022- 23 मध्ये येऊ शकतो. रशिया- युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारातील (Stock Market) प्रचंड घसरणीमुळे मार्चमध्ये एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) आणण्याचा निर्णय पुढे ढकलला जाऊ शकतो आणि तो 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात आणला जाऊ शकतो. या कालावधीत आयपीओसाठी रोड शो सुरू राहणार आहे.

एलआयसी आयपीओचा (LIC IPO) आकार 66, 000 कोटी रुपयांपेक्षा मोठा असू शकतो. एलआयसीने सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला असून मार्चच्या पहिल्या आठवड्यातच एलआयसीला आयपीओ आणण्यासाठी बाजार नियमाकाकडून मंजूरी मिळेल, असे मानले जात आहे. पण या उलथापालथीच्या युगात एवढ्या मोठ्या आकाराचा आयपीओ पचवणे बाजाराला सोपे जाणार नाही. तेही जेव्हा बाजारात विक्रीचे वातावरण असतांना आयपीओच्या यशासाठी बाजारातील स्थिरता खूप महत्वाची आहे. एलआयसीच्या आयपीओचे यश सरकारच्या अजेंड्यावर खूप जास्त आहे. करण यातून सरकारला मोठी रक्कम मिळणार आहे.

LIC IPO
नागपूरच्या कामगारांना मुंबईत आणून जमशेदजींनी केला होता 'स्वदेशी मिल' चमत्कार

रशियाने युक्रेनवर (Ukraine) केलेल्या हल्ल्यामुळे जगभरातील आर्थिक बाजारात भूकंप झाला आहे. शेअर बाजार दिवसेदिवसखाली घसरत आहे, त्यामुळे वस्तुचे भाव गगनाला भिडत आहेत. जागतिक तणावाचा परिणाम आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओवरही होऊ शकतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील सूचित केले आहे की वेगाने बादलणारी परिस्थिती पाहता, गरज भासल्यास सरकार LIC च्या IPO च्या टाइमलाईनवर पुनर्विचार करू शकते. रशिया-युक्रेन संघर्षामुळे जगभरातील शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. भारतीय शेअर बाजारही याला अपवाद नाही. परदेशी गुंतवणूकदारांपासून ते संस्थात्मक गुंतवणूकदारांपर्यंत बाजारात सातत्याने विक्री होत असते. त्यामुळे बाजारभावावर नकरात्मक परिणाम दिसून येत आहे. जानेवारी 2022 पासून सेसेक्स 10 टक्क्यांनी घसरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com