
Investment Tips: Try this option to continue regular income
Dainik Gomantak
एका विशिष्ट वयानंतर कोणत्याही व्यक्तीला आपले जीवन शांततेत जगायचे असते. सरकारी नोकरीत असलेल्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते, मात्र खासगी नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्याना अशी कोणतीही सुविधा मिळत नाही. यामुळे जर तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर आयुष्य सुकर करण्यासाठी नियमित उत्पनाच्या शोधात असाल आणि गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
पैशाची गुंतवणूक (Investment) करण्यासाठी सर्वात पहिले मुदत ठेविला पसंती दिली जाते. तुम्ही बँक FD, पोस्ट ऑफिस आणि NBFC मध्ये मुदत ठेव करू शकता. बँका (Bank) आणि पोस्ट ऑफिसच्या (Post Office) तुलनेत एनबीएफसी आणि कंपन्या जास्त परताव देतात. ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त सवलत मिळते. तथापि या मुदत ठेवींमध्ये सरकारी धोरणातील अचानक बदलांमुळे किंवा कंपनीच्या बाह्य घटकांमुळे डिफॉल्ट होण्याचा काही धोका असतो. सध्या FD वर वार्षिक 5.30 टक्के व्याज आहे. गुंतवणूकदारांना खात्रीशीर मासिक उत्पन्नाचा पर्याय देऊन, एफडीमधून (FD) मिळणारे व्याज नियमितपणे काढले जाऊ शकते.
*पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम
हा एक गुंतवणुकीचा पर्याय कोणत्याही जोखमीशिवाय लोकांसाठी अधिक चांगला सिद्ध होऊ शकतो. तुम्हाला या योजनेत एकरकमी पैसे जमा करावे लागतील म्हणजेच MIS खात्यात एकदाचा गुंतवणूक करा, त्यानंतर तुम्ही दरमहा कमाई करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो कि पोस्ट ऑफिसच्या (Post Office) कोणत्याही योजनेवर बाजारातील चढउताराचा कोणताही परिणाम होत नाही. पोस्ट ऑफिस MIS वर सध्या 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे.
* सरकारी रोखे
दीर्घकालीन सरकारी रोखे नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी पर्याय आहे. मॅच्युरिटी कालावधी बराच मोठा असला तरी, गुंतवणूकदार त्याचा वापर करून वर्षभर उत्पन्न मिळवू शकतात.
* मासिक उत्पन्न योजना
हे म्युच्युअल फंड (Mutual Funds) आहे जे प्रामुख्याने निश्चित उत्पन्न आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये एक छोटासा भाग गुंतवतात. फंड हाऊस (Fund House) नियमितपणे त्यांच्या गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्नासह पैसे (Money) देतात. रक्कम निश्चित नाही आणि फंडाच्या कामगिरीवर अवलंबून असते. यात नकारात्मक परतावा मिळण्याचीही शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.