कंगाल पाकिस्तानचं संरक्षण बजेट भारतासमोर कुठेच टिकत नाही!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी 2022-23 या वर्षामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी एकूण 5.25 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
India & Pakistan
India & PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी 2022-23 या वर्षामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी एकूण 5.25 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही तरतूद सुमारे दहा टक्क्यांनी अधिक आहे. यावेळी सरकारचा भर मेक इन इंडियावर अधिक आहे. सध्याच्या संरक्षण अर्थसंकल्पाची मागील काही वर्षांशी तुलना केली, तर दरवेळेप्रमाणेच यंदाही या क्षेत्रात अर्थसंकल्प (Budget) अधिक आला आहे. 2017-18 चे संरक्षण बजेट 2.74 कोटी रुपये होते. त्याच वेळी, 2019-20 च्या संरक्षण बजेटसाठी 3.05 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे 2020-21 मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी 471378 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. (India Invests More In Defence Than Pakistans Defence Budget)

आता भारताच्या शेजारी देशांच्या संरक्षण बजेटवर एक नजर टाकूया:-

पाकिस्तान (Pakistan) सरकारने 2021-22 या वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात संरक्षण अर्थसंकल्पासाठी 1,37,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, जी 2020-21 मधील संरक्षण बजेटपेक्षा सुमारे 8,100 कोटी रुपये जास्त होती. 2020-21 मध्ये पाकिस्तानचे संरक्षण बजेट 1,28,900 कोटी रुपये होते.

India & Pakistan
Union Budget 2022: संपूर्ण बजेट एका क्लिकवर...

चीनच्या (China) संरक्षण बजेटबद्दल बोलायचे तर ते भारताच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. 2021-22 या वर्षासाठी, चीनने आपले संरक्षण बजेट $ 209 अब्ज ( 1350 Chinese Yuan) ठेवले होते, जे 2020-21 मधील संरक्षण बजेटपेक्षा सुमारे सात टक्के जास्त होते. त्यावेळी संरक्षण क्षेत्रासाठी 196.44 अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली होती. चीन गेल्या सहा वर्षांपासून सतत संरक्षण बजेटमध्ये वाढ करत आहे.

अमेरिकेचे (America) संरक्षण बजेट सुमारे $740.5 अब्ज आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनंतर चीन संरक्षण क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करतो. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात चीनने सैनिकांच्या पगारात सुमारे 40 टक्के वाढ केली होती. याशिवाय 2027 पर्यंत सैन्यदलाचे आधुनिकीकरण करण्याची त्यांची योजना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com