How to Retire Early: वयाच्या चाळीशीत निवृत्त होऊन उरलेल्या आयुष्यात मौज करा; वाचा टिप्स

योग्य आर्थिक नियोजन केल्यास तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही सहज निवृत्त होऊ शकता.
Money
MoneyDainik Gomantak

तुम्हाला आयुष्यात किती वर्षे काम करायचे आहे? असा प्रश्न आजच्या तरुणांना विचारला तर त्यांचे उत्तर 35 ते 45 वर्षांच्या दरम्यान असे असेल. दररोज ऑफिसमध्ये जाऊन काम करायला, बॉससोबत भांडायला कोणाला आवडते? लोकांना लवकर निवृत्त होऊन उरेललं आयुष्य आरामात घालवायचे असते. योग्य आर्थिक नियोजन केल्यास तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही सहज निवृत्त होऊ शकता. पण यासाठी आर्थिक शिस्त खूप महत्त्वाची आहे.

निवृत्तीचे नियोजन करताना स्वतःला काही मूलभूत प्रश्न विचारा. तुमची जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला किती उत्पन्नाची आवश्यकता आहे? दुसरा प्रश्न, तुम्हाला किती लवकर निवृत्त व्हायचे आहे?

तुमचा मासिक किंवा वार्षिक खर्च किती असेल याचा हिशोब करण्यासाठी एक थंब नियम आपल्याला मदत करेल. याला 4 टक्के नियम म्हणतात. समजा तुम्ही 5 कोटी रुपयांसह निवृत्त झालात.. तर 4 टक्के नियमानुसार, तुम्ही दरवर्षी 5 कोटींपैकी 4 टक्के रक्कम वापरू शकता.. म्हणजेच 20 लाख रुपये वापरू शकता.

Money
Sajid Khan: साजिद खानच्या अडचणीत वाढ; अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून लैंगिक छळाची तक्रार

दरमहा उत्पन्नाच्या 50 ते 70 टक्के बचत करावी लागेल. पण, घरभाडे, जेवण, मुलांचे शिक्षण, गृहकर्ज यासह विविध अत्यावश्यक खर्चांसह निम्म्या उत्पन्नाची बचत करणे शक्य होणार नाही. परंतु आपण या पातळीच्या जवळ जमेल तितकी बचत करू शकतो. तसेच, आपण उत्पन्न वाढविण्याचा विचार देखील करू शकतो. यासाठी अर्धवेळ नोकरी, पगार वाढ मागणे, चांगल्या पगारासाठी नोकरी बदलणे, कौशल्ये वाढवणे किंवा उत्पन्नाचे दुसरे स्रोत शोधणे यासारखे साइड बिझनेस सुरू करून तुम्ही उत्पन्न वाढवू शकता.

खर्चाच नियोजन करण्यासाठी तुम्ही अनेक टिप्स वापरू शकता. नवीन ऐवजी जुनी कार वापरणे, शहरात राहत असाल तर सार्वजनिक वाहतूकीचा वापर करणे, घर घेण्याऐवजी भाड्याने रहायचा विचार करा, स्वतःचे जेवण स्वतः बनवा, रेस्टॉरंटचा खर्च कमी करा, क्रेडिट कार्डचे कर्ज टाळा ही यादी अजून मोठी होऊ शकते. पॅसिव्ह इनकम खूप महत्वाचे आहे. पॅसिव्ह इनकम शेअर्स, FD मधून मिळणारे व्याज, ब्लॉगचे उत्पन्न, YouTube चॅनेलद्वारे मिळणारे उत्पन्न, किंवा मिळणारे भाडे असे अनेक पर्यायाने तुम्ही पॅसिव्ह इनकम मिळवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com