पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया घ्या जाणून

पासपोर्ट एक नागरिकत्वाचा पुरावा म्हणून काम करते आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कामी येते.
Online Passport Process
Online Passport ProcessDainik Gomantak
Published on
Updated on

पासपोर्ट हे सर्वाचे ऑफिशियल दस्तऐवज आहे. पासपोर्ट एक नागरिकत्वाचा पुरावा म्हणून काम करते आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कामी येते. शिक्षण, पर्यटन, तीर्थयात्रा, व्यवसाय आणि इतर कारणांसह विविध कारणांसाठी परदेशात प्रवास करणाऱ्या लोकांसाठी पासपोर्ट आवश्यक आहे. ओळख आणि राष्ट्रीयत्वाचा पुरावा देण्याव्यतिरिक्त, पासपोर्ट पत्ता आणि जन्मतारीख पुरावा म्हणून देखील काम करू शकतो आणि इतर अधिकृत कारणांसाठी देखील वापरले जाऊ शकते. (Here how to apply for a passport online)

Online Passport Process
गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

भारतीय पासपोर्टचे विविध प्रकार

भारतीय पासपोर्ट सामान्यत: दहा वर्षांसाठी वैध असतात आणि प्रत्येक पासपोर्टमध्ये दोन तारखा असतात त्यामध्ये वैध तारीख आणि कालबाह्य तारीख यांचा उल्लेख असतो. सरासरी, पासपोर्टमध्ये 36 ते 60 पाने असतात. भारतीय पासपोर्टचे तीन प्रकार उपलब्ध आहेत. नियमित पासपोर्ट, डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि अधिकृत पासपोर्ट. पासपोर्ट असलेल्या प्रत्येक नागरिकाला परदेशात जाण्याची परवानगी नाहीये. विशिष्ट देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी नागरिकांना व्हिसासाठी अर्ज करणे देखील आवश्यक असते आणि व्हिसा मंजूर झाल्यानंतरच त्यांना देशात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येते. दरम्यान, तुमचा पासपोर्ट अपडेट ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

https://portal1.passportindia.gov.in/AppOnlineProject/welcomeLink/. इंटरनेट वापरकर्त्यांनी या वेबसाइटला भेट देऊन “नवीन वापरकर्ता नोंदणी” वर क्लिक करावे. त्यानंतर त्यांना त्यांचे संबंधित पासपोर्ट कार्यालय निवडावे लागेल आणि आवश्यक तपशील त्यामध्ये भरावा लागेल. त्यानंतर, वापरकर्त्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल आणि "नोंदणी करा" वरती क्लिक करून सर्व तपशील रजिस्टर करावे लागेल. शेवटी, वापरकर्त्यांना ईमेलमध्ये प्राप्त झालेल्या लिंकद्वारे त्याचे पासपोर्ट खाते सक्रिय करावे लागेल.

Online Passport Process
Indian Railway मध्ये मिळणार 'सात्विक भोजन': IRCTC ने इस्कॉन मंदिराशी केला करार

एकदा ऑनलाइन पोर्टल खाते सक्रिय झाल्यानंतर, वेबसाइटला पुन्हा भेट द्यावी लागेल आणि यावेळी 'वापरकर्ता लॉगिन' वर क्लिक करावे लागेल. आता नवीन पासपोर्टला अर्ज करण्यासाठी किंवा आधीच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी खाली नमूद केलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा: लॉग इन केल्यानंतर "नवीन पासपोर्टसाठी अर्ज करा/ पासपोर्ट पुन्हा जारी करा" वर क्लिक करा : नवीन अर्जासाठी सर्व आवश्यक तपशील भरून घ्या. आवश्यक रक्कम भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंटचा वापर करा.

'अर्ज पावती प्रिंट करा' वर क्लिक करा आणि प्रिंट काढून घ्या. अर्जदारांना पासपोर्टसाठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी आवश्यक आहे. त्यासाठी लागण्याऱ्या दस्तऐवजांमध्ये जन्म प्रमाणपत्र, हस्तांतरण/शाळा सोडण्याचे/मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र, सार्वजनिक जीवन विमा कॉर्पोरेशन/कंपन्यांचे पॉलिसी बाँड, आधार कार्ड/ई-आधार, निवडणूक फोटो ओळखपत्र, पॅन कार्ड आणि पत्ता पुरावा यांचा समावेश आहे.

ई-पासपोर्ट म्हणजे काय?

भारत सरकारने 2019 मध्ये या ई-पासपोर्टची घोषणा केली आणि लवकरच त्यांची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा वर्तवली आहे. हे ई-पासपोर्ट वाचण्यास सोपे जाईल अशी अपेक्षा आहे. तसेच त्याचे पुढील आणि मागील कव्हर जाड असणार आहे. ई-पासपोर्टच्या मागील कव्हरमध्ये सिलिकॉन चिप देखील असेल ज्यामध्ये 64KB मेमरी स्पेस असणार आहे. पासपोर्ट धारकाचे फिंगरप्रिंट चिपमध्ये साठवले जाणे अपेक्षित आहे. यूएस-सरकारच्या प्रयोगशाळेने या प्रकारच्या पासपोर्टच्या प्रोटोटाइपची आधीच चाचणी केली आहे. एकदा ते वापरामध्ये आल्यानंतर, ई-पासपोर्टचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी बनेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com