पेट्रोल आणि डिझेलवरील करात बदल, सरकारने आता घेतला 'हा' निर्णय!

Windfall Tax on Diesel: गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.
Petrol-Diesel
Petrol-Diesel Dainik Gomantak
Published on
Updated on

Windfall Tax on Diesel: गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आता सरकारने क्रूड पेट्रोलियमवरील विंडफॉल टॅक्स कमी करुन 6,700 रुपये प्रति टन केला आहे.

यासोबतच, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील उपकर वाढवण्यात आला आहे. नवीन किमती आजपासून म्हणजेच 2 सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत.

शासनाने अधिसूचना जारी केली

याबाबतची माहिती शासनाकडून अधिसूचना जारी करुन देण्यात आली आहे. स्वदेशी उत्पादित कच्च्या तेलावरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED) पूर्वी 7,100 रुपये प्रति टन वरुन 6,700 रुपये प्रति टन करण्यात आले आहे.

Petrol-Diesel
Income Tax Return: ITR फाइल न करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! भरावा लागू शकतो एवढ्या हजारांचा दंड

डिझेल 6 रुपयांनी वाढले

अधिसूचनेनुसार, डिझेलच्या (Diesel) निर्यातीवरील SAED 6 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे, जो पूर्वी 5.50 रुपये प्रति लिटर होता. त्याचवेळी, विमान इंधनावरील SAED प्रति लिटर 2 रुपये वरुन 4 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.

पेट्रोलच्या निर्यातीवर SAED शून्य आहे

पेट्रोलच्या निर्यातीवरील SAED शून्य आहे. अधिसूचनेतून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कर दर शनिवारपासून लागू झाले आहेत.

Petrol-Diesel
Direct Tax Collection: मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी, 10 ऑगस्टपर्यंत तिजोरीत आले 6.53 लाख कोटी!

2022 मध्ये प्रथमच SAED लावण्यात आला होता

दुसरीकडे, 1 जुलै 2022 पासून केंद्र सरकार (Government) ने प्रथमच कच्च्या तेलाचे उत्पादन आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर SAED लादले. या शुल्कातून सरकारची कमाई FY2023 मध्ये सुमारे 40,000 कोटी रुपये असेल असा अंदाज आहे.

विंडफॉल टॅक्स म्हणजे काय?

आपल्या देशात समुद्रसपाटीपासून काढलेले कच्चे तेल शुद्ध केले जाते. यामध्ये पेट्रोल-डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधन या इंधनाचे रुपांतर करुन नंतर ते सरकारच्या वतीने इतर देशांमध्ये निर्यात केले जाते. या निर्यातीवर सरकार काही शुल्कही लावते, ज्याला 'विंडफॉल टॅक्स' म्हणतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com