Millionaires Leaving India: करोडपती लोक भारत सोडून परदेशात का स्थायिक होतायेत? जाणून घ्या यामागचं कारण

HNI च्या अहवालानुसार, 2023 मध्ये, सुमारे 6500 हाय नेटवर्थ इंडिविजुअल्स (High Net Worth Individuals) देश सोडून जाऊ शकतात.
Millionaires Leaving India
Millionaires Leaving IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Super Rich Indian Leaving Country: दरवर्षी हजारो भारतीय करोडपती परदेशात स्थायिक होतात. HNI च्या अहवालानुसार, 2023 मध्ये, सुमारे 6500 हाय नेटवर्थ इंडिविजुअल्स (High Net Worth Individuals) देश सोडून जाऊ शकतात.

या अहवालानंतर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, भारतीय करोडपती लोक देश सोडून का जात आहेत? कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे देश अतिश्रीमंत भारतीयांचे आश्रयस्थान बनत आहेत.

भारतातील (India) वाढत्या करांच्या दरामुळे असे होत आहे का, या देशांतील करांचे दर भारतापेक्षा कमी आहेत का? चला तर मग जाणून घेऊया नेमके कारण...

टॅक्स रेट हे देश सोडण्याचे कारण नाही

कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांमधील अतिश्रीमंतांसाठी कराचे दर भारतापेक्षा खूप जास्त आहेत. माहितीनुसार, पर्सनल उत्पन्नाचा कमाल दर कॅनडात 54, अमेरिकेत 51.6 आणि ऑस्ट्रेलियात 45 आहे. तर भारतात हे प्रमाण केवळ 30 टक्के आहे.

Millionaires Leaving India
Indian Railways Hospital Train: जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन भारतात; उपचारापासून शस्त्रक्रियेपर्यंत सर्व काही रेल्वेतच...

तसेच, 20 पैकी 15 G20 देशांमध्ये पर्सनल इन्कम टॅक्स (Income Tax) दर भारतापेक्षा जास्त आहेत. तर, G20 मध्ये भारत हा तिसरा देश आहे, जिथे कमाल कॉर्पोरेट कर 30 टक्क्यांपर्यंत आहे. विशेष म्हणजे, भारतातील कमाल टॅक्स दरावर अधिभार आणि उपकर दोन्ही लागू आहेत. पर्सनल कराबद्दल बोलायचे झाल्यास, अधिभार कर दायित्वाच्या 25 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.

दुसरीकडे, जर ब्रिक्सच्या 5 देशांबद्दल बोलायचे झाल्यास, चीन आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कमाल इन्कम टॅक्स दर 45 टक्के आहे, जो भारताच्या तुलनेत खूप जास्त आहे. या सगळ्यात आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना डिजिटलायझेशन आणि जागतिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या कर आव्हानांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.

Millionaires Leaving India
7th Pay Commission: महागाई भत्त्याबाबत खूशखबर, सरकारने पुन्हा वाढवला DA; कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले!

लोकांना चांगली जीवनशैली जगायची आहे

जगभरातील सर्व देशांचे टॅक्स स्लॅबबद्दल माहिती घेतल्यानंतर असे लक्षात येते की, भारतीय श्रीमंतांनी देश सोडून परदेशात स्थायिक होण्यामागील मुख्य कारण टॅक्स दरात वाढ न होणे हे आहे.

लोकांना चांगली जीवनशैली, काम आणि चांगले जीवन जगायचे आहे, ज्यासाठी त्यांना इतर देशांमध्ये स्थायिक व्हायचे आहे. एवढेच नाही तर देशातील अतिश्रीमंतांना अधिक संपत्ती कमवायची आहे, म्हणून त्यांना इतर देशांमध्ये स्थायिक व्हायचे आहे.

2023 मध्ये अनेक श्रीमंत लोक स्थलांतर करु शकतात

जगभरातील संपत्ती आणि गुंतवणुकीच्या मायग्रेशनवर लक्ष ठेवणाऱ्या हेन्लीच्या अहवालानुसार, भारतीय करोडपती आपला देश सोडून परदेशात स्थायिक होण्याच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

तर, देश सोडून इतरत्र स्थायिक होणाऱ्यांमध्ये चीन पहिला आहे, जिथून यावर्षी 13,500 श्रीमंत लोक स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. या यादीत तिसरा क्रमांक ब्रिटनचा आहे, जिथून 2023 मध्ये 3,200 श्रीमंत लोक स्थलांतरीत होऊ शकतात.

तर, या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या रशियाचा लागतो, जिथून 3,000 लोक परदेशात जाण्याचा अंदाज आहे.

Millionaires Leaving India
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून मिळणार 'हे' दोन मोठे लाभ; पगारवाढीत होणार बंपर वाढ!

जाणून घ्या तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे

मात्र, तज्ज्ञांच्या मते, करोडपतींनी देश सोडणे ही फार चिंतेची बाब नाही. त्यामागचा त्यांचा युक्तिवाद असा आहे की, 2031 पर्यंत करोडपतींची संख्या जवळपास 80 टक्क्यांनी वाढू शकते. दरम्यान, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या संपत्तीच्या बाजारपेठांपैकी एक असेल. देशातील वित्तीय सेवा, तंत्रज्ञान आणि फार्मा क्षेत्रे सर्वाधिक संपत्ती निर्माण करतील.

Millionaires Leaving India
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA बाबत आनंदाची बातमी, आता दर महिन्याला खात्यात येणार एवढे पैसे!

तज्ज्ञांच्या मते, भारतीय श्रीमंतांचे सर्वाधिक पसंतीचे देश सिंगापूर आणि दुबई आहेत. अहवालानुसार, 2023 मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये जगभरातून सर्वाधिक 5,200 लक्षाधीशांची संख्या अपेक्षित आहे.

तर, UAE या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे यावर्षी 4,500 लक्षाधीश येण्याची शक्यता आहे. या यादीत सिंगापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 3,200 श्रीमंत लोक येण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, अमेरिकेत सुमारे 2,100 श्रीमंता लोक पोहोचण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com