Adani Group: अदानी समूह आता देशातील ‘या’ क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार; 8.35 लाख कोटींची करणार गुंतवणूक

Adani Group: देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी अनेक वर्षांपूर्वी देशाच्या बंदर क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तेव्हापासून देशातील बंदर क्षेत्र पूर्णपणे बदलले आहे.
Gautam Adani
Gautam AdaniDainik Gomantak

Adani Group: देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी अनेक वर्षांपूर्वी देशाच्या बंदर क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तेव्हापासून देशातील बंदर क्षेत्र पूर्णपणे बदलले आहे.

आज, अदानी समूहाची अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन ही केवळ देशातील सर्वात मोठी बंदर कंपनीच नाही तर ती आता जगातील सर्वात मोठ्या बंदर कंपन्यांपैकी एक बनली आहे. अदानी समूह आता आणखी एका क्षेत्राचा कायापालट करणार आहे. अदानी समूह सुमारे 8.35 लाख कोटींची (एकूण 100 अब्ज डॉलर्स) या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे.

दरम्यान, अदानी समूह (Adani Group) दीर्घकाळापासून ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये काम करत आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही समूह कंपनी गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहे. अशा परिस्थितीत देशातील ऊर्जा क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्यासाठी अदानी समूह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

अदानी समूह सूर्यप्रकाशापासून वीज निर्मितीसाठी सोलर फार्म आणि वाऱ्यापासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी विंड मिल फार्म विकसित करत आहे. याशिवाय, कंपनी ग्रीन हायड्रोजन, पवन ऊर्जा टर्बाइन आणि सौर पॅनेल बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोलायझर्सचे उत्पादन युनिट उभारत आहे.

ग्रीन हायड्रोजन पाण्यापासून वेगळे करुन तयार केले जाते. आज वाहने चालवण्यासाठी वापरले जाणारे हे सर्वात स्वच्छ इंधन आहे. त्याचवेळी, ते औद्योगिक ऑपरेशनमध्ये देखील वापरले जाऊ शकते.

ग्रुप सर्वात स्वस्त ग्रीन इलेक्ट्रॉन बनवणार

रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या वार्षिक इन्फ्रास्ट्रक्चर समिट-2024 कार्यक्रमात गौतम अदानी बोलत होते. अदानी म्हणाले की, आगामी काळात ऊर्जा क्षेत्र आणि डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सच्या संधी उपलब्ध आहेत. यामुळे स्थानिक आणि जागतिक पातळीवर भारत बदलेल.

दरम्यान, अदानी समूह पुढील दशकात ऊर्जा बदलासाठी 100 अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक (Investment) करणार आहे. जगातील सर्वात स्वस्त ग्रीन इलेक्ट्रॉन बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे अदानींनी सांगितले. हे अनेक क्षेत्रांसाठी ‘फीडस्टॉक’ म्हणून काम करेल, असेही ते पुढे म्हणाले. जगभरातील ऊर्जा स्रोत बदलाची बाजारपेठ सुमारे $3,000 अब्ज होती, जी 2030 पर्यंत $6,000 अब्जपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 2050 पर्यंत दर 10 वर्षांनी दुप्पट होईल, असेही शेवटी अदानींनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com