गौतम अदानी यांना मिळाले 'कोल इंडिया' कोळसा आयातीचे कंत्राट

भारतातील सर्वात मोठी कोळसा खाण कंपनी कोल इंडियाचे कोळसा आयातीचे कंत्राट दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांना देण्यात आले.
Gautam Adani
Gautam Adani Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतातील सर्वात मोठी कोळसा खाण कंपनी कोल इंडियाचे कोळसा आयातीचे कंत्राट दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना देण्यात आले. कोळशाच्या संकटाच्या काळात कोल इंडियाने वीज निर्मिती कंपन्यांऐवजी कोळसा आयात करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी त्यांनी निविदा मागवल्या होत्या. अदानी एंटरप्रायझेसने 4033 कोटी रुपयांची सर्वात कमी बोली लावून ती बोली जिंकली. या बोली अंतर्गत, अदानी एंटरप्रायझेस ( गौतम अदानी ) 2.416 दशलक्ष टन कोळशाचा पुरवठा करणार आहे. मोहित मिनरल्स 4182 कोटींच्या बोलीसह दुसऱ्या आणि चेट्टीनाड लॉजिस्टिक्सने 4222 कोटींच्या बोलीसह तिसरे स्थान पटकावले आहे. (Gautam Adani gets Coal India coal import contract)

Gautam Adani
गोव्यात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर

हा आयात केलेला कोळसा सात राज्य वीज निर्मिती कंपन्या आणि 19 खाजगी वीज प्रकल्पांना हस्तांतरित केला जाणार आहे. अदानी एंटरप्रायझेसला NTPC कडून कोळसा आयातीचे अनेक करार देखील मिळाले आहेत. हा करार जानेवारी ते जून दरम्यान देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील कारमाइकल कोळसा खाणीसाठी अदानीकडे कंत्राट देण्यात आले आहे. डिसेंबर 2021 मध्ये, अदानी समूहाने या खाणीतून प्रथमच कोळसा पाठवला होता. मंगळवारी कोल इंडियाने जारी केलेल्या दोन ई-निविदांसाठी अदानी एंटरप्रायझेसही आपली बोली सादर करणार आहे, असे सांगण्यात आले. ही बोली 6 दशलक्ष टन कोळशासाठी असणार आहे.

पावसाळ्यानंतर विजेच्या मागणीत अचानक वाढ

वीज संकट टाळण्यासाठी कोळशाच्या खाणींमध्ये पावसाळ्यात पाणी तुंबण्यापूर्वी सरकारला कोळशाचा पुरेसा साठा ठेवावा लागेल. मान्सूननंतर भारतात विजेची मागणी जास्त असते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पावसाळ्यानंतर शेतीची कामे जास्त असतात आणि अशा परिस्थितीत विजेचा तुटवडा भासणार नाही, त्यासाठी वीजनिर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे.

किमान 10 टक्के कोळसा आयात निर्देश

CEA अर्थात केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, थर्मल पॉवर प्लांट्समध्ये सध्या एकूण 26.8 दशलक्ष टन कोळशाचा साठा असणार आहे. सरकारने वीज प्रकल्पांना 10 टक्के कोळसा आयात करण्यास सांगितले तर देशांतर्गत उत्पादनातून 90 टक्के गरज भागवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com