Income Tax Rule: सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम; आयकरचे 'हे' नियम बदलले

1 जुलै 2022 पासून आयकराशी संबंधित तीन नियम खालीलप्रमाणे बदलण्यात आले आहेत.
Income Tax Rules
Income Tax RulesDainik Gomantak

जुलै महिना जवळ येत असताना, एकाच वेळी अनेक नवीन आयकर नियम (New Income Tax Rules) लागू करण्यात आले आहेत, ज्याचा परिणाम करदात्यांना होणार आहे आणि आगामी काळात आणखी कर भरावा लागणार आहे. 1 जुलै 2022 पासून आयकराशी संबंधित तीन नियम खालीलप्रमाणे बदलण्यात आले आहेत. (New Income Tax Rules Updated News)

Income Tax Rules
क्रूडचे भाव $ 8 ने घसरले, आज गोव्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त?

क्रिप्टोकरन्सीवरील TDS

वित्तमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDAs) म्हणजेच क्रिप्टोकरन्सी आणि नॉन फंगीबल टोकन्स (NFTs) च्या हस्तांतरणावर केलेल्या पेमेंटवर 1 टक्के TDS लादण्याची घोषणा करण्यात आली होती. 10,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1% TDS लागू होईल, जो शुक्रवार, 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात आला आहे. क्रिप्टोकरन्सी हस्तांतरित करताना खरेदीदाराकडे पॅन नसल्यास, 20 टक्के दराने कर भरावा लागणार आहे. आणि जर खरेदीदाराने आयकर रिटर्न भरला नसेल तर 5 टक्के दराने टीडीएस भरावा लागणार आहे.

1 जुलै, 2022 पासून, सर्व क्रिप्टो व्यवहारांवर TDS भरावा लागेल मग तो नफा किंवा तोटा मध्ये विकला गेला असेल. 2022-23 पासून, क्रिप्टोकरन्सीजमधून (Cryptocurrencies) मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% भांडवली नफा कर आकारण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे जो लागू आधीपासूनच आहे. जे गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सी नफ्यासाठी विकत नाहीत त्यांना देखील कर भरावा लागणार आहे. अशा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एक टक्का टीडीएस भरावा लागेल जेणेकरून सरकार क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करणाऱ्यांचा नेमका ठावठिकाणा शोधू शकणार आहेत.

Income Tax Rules
GST कलेक्शनवर अर्थमंत्र्यांनी दिली खूशखबर, रुपयाच्या स्थितीबाबत RBI सतर्क

1 जुलै 2022 पासून सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर टाकणारे आणि डॉक्टरांसाठी नवीन TDS नियम,

डॉक्टर आणि सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांना 10 टक्के TDS भरावा लागणार आहे. जे कोणी डॉक्टर्स किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सेल्स प्रमोशन करण्यासाठी कंपनी कडून बेनिफिट्स घेतात त्यांना देखील 10 टक्के टीडीएस भरावा लागणार आहे. CBDT नुसार, 20,000 रुपयांपेक्षा जास्त कमोडिटीच्या स्वरूपात कोणताही नफा किंवा लाभ मिळाल्यावर, हा लाभ देणाऱ्या व्यक्तीला तो वजा केल्यावर 10 TDS भरावा लागणार आहे. जर फायद्याचे मूल्य 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर टीडीएस भरावा लागणार नाहीये.

आधार-पॅन लिंकवर दुहेरी दंड

1 जुलै 2022 पासून, पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी दुप्पट दंड भरावा लागणार आहे. 1 एप्रिल 2022 पासून आधारला पॅन क्रमांकाशी जोडण्यासाठी 500 रुपये दंड भरावा लागत होता, परंतु CBDT च्या आदेशानुसार, जर तुम्ही 30 जून 2022 पर्यंत लिंक केले नाही तर तुम्हाला 1 जुलैपासून 1,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. CBDT ने म्हटले आहे की करदात्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना ही सुविधा दिली जात आहे की ते 31 मार्च 2023 पर्यंत आधार कार्ड पॅनशी लिंक करू शकतात मात्र, दंड भरावाच लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com