अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्पाशी संबंधित माहिती देणार आहेत. गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्यासाठी हा अर्थसंकल्प फायदेशीर असल्याचे सरकारने म्हटले आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा मध्यमवर्गीयांना झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 बद्दल बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "या अर्थसंकल्पात तरुण भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. अर्थसंकल्पात दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि नवकल्पना यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधीची तरतूद आहे."
"भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या उद्दिष्टाच्या संदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, हा अर्थसंकल्प भारतीय वित्तीय क्षेत्र मजबूत करेल. अंतरिम अर्थसंकल्प निर्यात वाढवेल, उद्योगांना चालना देईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल."
गोव्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण पाहतानाचा क्षण.
अंतरिम अर्थसंकल्प 2024 वर काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांचे वक्तव्य आले आहे. ते म्हणाले की, हा एक व्होट ऑन अकाउंट अर्थसंकल्प आहे, ज्याचा एकमेव उद्देश चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारला चांगल्या आर्थिक स्थितीत ठेवणे हा आहे.
अर्थसंकल्पात 18 लाख कोटी रुपयांची तूट असणे ही चिंतेची बाब असल्याचे काँग्रेस नेत्याने सांगितले. याचा अर्थ असा की सरकार आपला खर्च भागवण्यासाठी कर्ज घेत आहे जे पुढील वर्षी आणखी वाढणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या, आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा कायम ठेवली आहे. वास्तविक, अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही लोकाभिमुख घोषणा केल्या जात नाहीत. यामुळेच सरकारने कोणत्याही प्रकारच्या घोषणा करण्याचे टाळले आहे. मात्र, व्यावसायिक कर 22 टक्के करण्यात आला आहे.
'प्रत्यक्ष कर संकलन 10 वर्षांत तीन पटीने वाढले आहे. करदात्यांची संख्या 2.4 पट वाढली आहे. देशाच्या विकासात करदात्यांच्या योगदानाचा उपयोग होत आहे. सरकारने कराचे दर कमी केले आहेत. लागू करण्यात आलेल्या नवीन कर योजनेअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. कॉर्पोरेट टॅक्सही कमी करण्यात आला आहे. नवीन फॉर्म 26AS सह कर भरणे सोपे झाले आहे. 2013-14 मध्ये 93 दिवसांऐवजी आता 10 दिवसात परतावा दिला जात आहे.
'नवीन तंत्रज्ञान व्यवसायाला मदत करत आहे. लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान, जय किसानचा नारा दिला होता. अटलजींनी जय जवान, जय किसान, जय विज्ञानाचा नारा दिला होता.
याबाबत अधिक माहिती देताना पंतप्रधान मोदींनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानचा नारा दिला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात रस असणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ आहे. १ लाख कोटी रुपयांचा निधी बिनव्याजी किंवा कमी व्याजदराने वितरित केला जाईल. यामुळे दीर्घकालीन आर्थिक मदत मिळेल. यामुळे खाजगी क्षेत्राला मदत होईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की, सरकार गरीब लोकांना घरे खरेदी करण्यासाठी आणि बांधण्यासाठी आर्थिक मदत करेल. त्या म्हणाल्या की, सरकार मध्यमवर्गीय लोकांना आणि झोपडपट्ट्या व चाळींमध्ये राहणाऱ्यांना घर खरेदी आणि बांधण्यासाठी मदत करणार आहे.
पीएम स्वानिधीच्या माध्यमातून 18 लाख विक्रेत्यांना मदत करण्यात आली आहे.
किसान सन्मान निधी आणि पीएम फसल योजनेच्या माध्यमातून अन्नदाताला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यात आले. 11.8 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ मिळत आहे.
देशात 3000 नवीन ITII उघडण्यात आले.
1.40 कोटी तरुणांना स्किल इंडियाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
15 नवीन AIIMS आणि 390 नवीन विद्यापीठे निर्माण करण्यात आली आहेत.
सर्वसामान्यांचे उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढले आहे.
छतावरील सौरऊर्जेच्या माध्यमातून एक कोटी घरांना सौरऊर्जेद्वारे दरमहा ३०० युनिट मोफत वीज मिळणार आहे. यामुळे 15-18 हजार रुपयांची बचत होणार आहे. ई-वाहनांच्या चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन्सची मोठ्या प्रमाणात स्थापना केली जाणार आहे.
"...आपल्या तरुण देशाला उच्च आकांक्षा आहेत, वर्तमानात अभिमान आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी आशा आणि आत्मविश्वास आहे. आम्ही आशा करतो की, आमच्या सरकारच्या उत्कृष्ट कार्याला देशवासीय पुन्हा एकदा जनादेशाचा आशीर्वाद देतील."
मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. काही वेळानंतर अर्थमंत्री संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.
अंतरिम अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळत आहे. सकारात्मक सुरुवातीनंतर बाजारात मंदी दिसून आली. मात्र, सुरुवातीच्या दबावातून बाहेर पडल्यानंतर बाजार पुन्हा सकारात्मक झाला आहे.
गुरुवारी, सेन्सेक्स 219.05 (0.30%) अंकांच्या वाढीसह 71,960.01 च्या पातळीवर पोहोचला. त्याच वेळी, निफ्टी 58.46 (0.27%) अंकांनी वाढून 21,784.15 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संसद भवनात सुरू झाली आहे. काही वेळाने निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील.
अंतरिम अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत पोहोचल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेटसाठी विशेष तयारी केली आहे. यावेळी निवडणुका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या शेवटच्या अर्थसंकल्पाकडून जनतेला विशेष अपेक्षा आहेत.
महागाई आणि बेरोजगारीवरून गदारोळ करण्याची विरोधकांकडून तयारी सुरू आहे. परंपरेनुसार फोटो सेशननंतर अर्थमंत्री अर्थसंकल्पाची मंजुरी घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचल्या आहेत. नंतर त्या संसदेत पोहोचतील आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत बजेट मंजूर होईल.
अर्थसंकल्पापूर्वी भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २४६ अंकांच्या वाढीसह ७१,९९८.७८ वर उघडला. तो उघडताच 72,000 चा आकडा गाठला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्रालयातून अर्थसंकल्प 'बुक-खाते' घेऊन राष्ट्रपती भवनात दाखल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी अर्थ मंत्रालयाचील अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत फोटोशूटसाठी त्या मंत्रालयात दाखल झाल्या आहेत.
तज्ज्ञांचा दावा आहे की, किसान सन्मान निधीची रक्कम 9,000 रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते, तर महिला शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळू शकतात. तसेच महिला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास प्राधान्य असेल. त्यांना इतरांपेक्षा एक टक्का स्वस्त कर्जाची तरतूद असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात जीवन विमा योजना देखील मिळू शकते असे जाणकारांचे मत आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, शेतकरी आणि कामगारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताच निर्मला सीतामरण सलग सहा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत. असे करणाऱ्या त्या दुसऱ्या अर्थमंत्री असतील. त्यांच्या आधी हा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर होता.
त्याचबरोबर मनमोहन सिंग, पी चिदंबरम, अरुण जेटली आणि यशवंत सिंगा यांनी पाच अर्थसंकल्प सादर केले आहेत. मोरारजी देसाई यांच्या नावावर आतापर्यंत सर्वाधिक 10 अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.
अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूजवर पाहू शकता. याशिवाय डीडी नॅशनलवरही थेट प्रक्षेपण पाहता येईल. भाषण फोनवर लाईव्ह पाहायचे असेल तर तुम्ही डीडी न्यूजच्या अधिकृत YouTube चॅनेलला भेट देऊ शकता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आपला पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन यांनी यापूर्वी सलग 5 पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. अशी कामगिरी करणाऱ्या त्या दुसऱ्या मंत्री यावेळी अर्थमंत्र्यांच्या बजेट बॉक्समधून अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात, ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.