EDLI Scheme: शासनाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही आणि योजनेची माहिती नसल्यामुळे पात्र लोकांनाही त्याचा लाभ घेता येत नाही. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे म्हणजे EPFO चे सदस्य असाल तर तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की, तुमचा EPFO द्वारे विमा उतरवला आहे. तुम्हाला हा विमा कधी मिळेल? याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला EPFO पोर्टलवर एक महत्त्वाचे काम करायचे आहे, तेही तुम्ही वेळेवर करावे.
ई-नामांकन अनिवार्य
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेधारकांसाठी ई-नामांकन अनिवार्य केले आहे. जर तुम्ही ई-नामांकन केले नाही तर तुम्हाला पीएफ पोर्टलवर कोणतीही सुविधा मिळणार नाही. नॉमिनी अपडेट ठेवल्याने खातेधारकाच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळते. यासाठी ईपीएफओने यापूर्वीही अनेकदा अलर्ट जारी केले होते.
काय अद्यावत करणे आवश्यक
ईपीएफओने नॉमिनी अपडेट करण्यासाठी खातेधारकांना अनेक अलर्ट जारी केले होते. नॉमिनी अपडेट करण्यासाठी, तुम्हाला नॉमिनीचे नाव, जन्मतारीख यासारखी माहिती भरावी लागेल. खातेदाराने नॉमिनी लवकरात लवकर अपडेट करावे, असे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. नॉमिनी अपडेट न केल्यास सदस्याच्या कुटुंबीयांना नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते, कारण खातेदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनी किंवा कुटुंबातील सदस्यांना पीएफ, पेन्शनशी (Pension) संबंधित पैसे काढण्यासाठी मदत मिळते. जर तुम्ही नॉमिनीला अपडेट ठेवत असाल तर तुम्ही ऑनलाइनही दावा करु शकता.
ईपीएफओ 7 लाख रुपये देणार
सदस्याचा (Member) विमा देखील EPFO द्वारे केला जातो. या अंतर्गत सदस्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही नॉमिनी अपडेट न ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांना हा विमा मिळण्यास त्रास होऊ शकतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.