दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सरकारचे ग्राहकांना आवाहन

23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने/ कलाकृतींसाठी दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले.
Diwali Festival 2021: Centre asks people to buy only hallmarked jewellery
Diwali Festival 2021: Centre asks people to buy only hallmarked jewelleryDainik Gomantak
Published on
Updated on

दिवाळीच्या मुहूर्तावर (Diwali Festival) ग्राहकांनी हॉलमार्क (Hallmark) असलेले दागिनेच खरेदी (Gold) करण्यास सरकारने सांगितले आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने याबाबत एक प्रकाशन जारी केले आहे ज्यात असे नमूद केले आहे की खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता कशी सुनिश्चित करावी आणि आपल्या पैशासाठी सर्वोत्तम मूल्य आणि त्या मूल्यातून मिळणारे सर्वोत्तम दागिने (jewellery) यासाठीचे ज्ञान असणे महत्वाचे आहे असे देखील सरकारने संगीतले आहे. (Diwali Festival 2021: Centre asks people to buy only hallmarked jewellery)

"हॉलमार्क केलेले दागिने फक्त BIS नोंदणीकृत ज्वेलर्स विकू शकतात. तुमच्या जिल्ह्यातील BIS नोंदणीकृत ज्वेलर्सचे तपशील BIS च्या साइटवरून मिळू शकतात,"असे देखील सरकारकडून या अहवालात सांगण्यात आले आहे. गोल्ड हॉलमार्किंग हे सोन्याचे शुद्धता प्रमाणपत्र आहे.सरकरने हॉलमार्क बद्दल अधिक सप्ष्टीकरण देताना "हॉलमार्कडोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नसल्यास, ज्वेलर्सकडून एक भिंग मागवा," असे देखील म्हटले आहे.ऐन दिवाळीत ज्यावेळेस सोन्याची विक्री अधिकच वाढते त्याकाळात सरकारने असे नवीन नियम आणले आहेत.

1 जुलै 2021 पासून सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड लागू केल्यामुळे, हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या कलाकृतींमध्ये गुणांचे आणि शुद्धतेचे प्रमाण अधिक वाढताना दिसत आहे. 23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने/ कलाकृतींसाठी दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले. हे 256 जिल्हे असे जिल्हे आहेत जिथे किमान एक परख आणि हॉलमार्किंग केंद्र आहे.ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या मते, हॉलमार्क विक्रीच्या पहिल्या टप्प्यावर केला जाईल जो निर्माता, संपूर्ण-विक्रेता, वितरक किंवा किरकोळ विक्रेता असू शकतो.

Diwali Festival 2021: Centre asks people to buy only hallmarked jewellery
बँक कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड, महागाई भत्त्यात मोठी वाढ

नवीन नियमांनुसार 14, 18, किंवा 22-कॅरेट सोन्याचे दागिने बीआयएस हॉलमार्कशिवाय विकल्यास, ज्वेलर्सला वस्तूच्या किंमतीच्या पाच पट दंड किंवा एक वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.ग्राहकांना फसवणूक होऊ नये आणि शुद्ध दागिने मिळावेत यासाठी केंद्र सरकारने हा उपक्रम राबवला आहे..

सरकारी आदेशानुसार, मौल्यवान धातूच्या वस्तू विकण्यात गुंतलेला कोणताही उत्पादक, आयातदार, घाऊक विक्रेता, वितरक किंवा किरकोळ विक्रेता यांना बीआयएसमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी प्रक्रिया एकवेळ असेल आणि त्यासाठी ज्वेलर्सकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.सरकारी आदेशानुसार, मौल्यवान धातूच्या वस्तू विकणारा कोणताही उत्पादक, आयातदार, घाऊक विक्रेता, वितरक किंवा किरकोळ विक्रेता यांना बीआयएसमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी प्रक्रिया एकवेळ असेल आणि त्यासाठी ज्वेलर्सकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com