Public Provident Fund बाबत केंद्र सरकारकडून मोठी अपडेट, जाणून घ्या..

पीपीएफधारकाचा काही कारणास्तव मृत्यू झालाच तर त्याचे पैसे हे त्यानं नेमलेल्या नॉमिनीला मिळतात.
Public Provident Fund
Public Provident FundDainik Gomantak

Public Provident Fund: केंद्र सरकारच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेचा नोकरदारवर्गाला चांगला फायदा घेता येतो. या योजनेतून अनेक अपडेट्स समोर येत असतात. आपल्याला आपल्या रिटायरमेंटमध्ये या योजनेचा चांगला फायदा करून घेता येतो. केंद्र सरकारकडून या योजनेतून एक मोठी अपडेट समोर येते आहे. आता या योजनेचा फायदा तुमच्या लहान मुलांनाही होऊ शकतो.

आपल्या एक ठराविक रक्कमेतून पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये पैसे गुंतवावे लागतात आणि त्याचबरोबर तुम्हाला यात एक ठराविक व्याज मिळते. तुम्ही यातून तुमच्या जवळच्या व्यक्तींना नोमिनी करू शकता.

जर का पीपीएफधारकाचा काही कारणास्तव मृत्यू झालाच तर त्याचे पैसे हे त्यानं नेमलेल्या नॉमिनीला मिळतात. त्याचसोबत यातून तुम्ही तुमचा टॅक्सही वाचवू शकता. असे अनेक फायदे या योजनेचे आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा करून घेता येतो.

पीपीएफधारकाच्या मृत्यूनंतर हे विश्वासातील नॉमिनी त्याचा फायदा उचलू शकतात. तुम्ही या स्किममध्ये 500 रूपयांपासून ते 1.5 लाख रूपयांमध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये नोकरदरांच्या पगारातून (Salary PPF Account) 700-800 रूपये जातात पण याचा फायदा तुम्हाला भविष्यात चांगला होऊ शकतो. कारण यातून तुम्हाला 7.1 टक्क्यांचे व्याज मिळते. यातून तुम्ही 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

तसेच तुमची मुलं अठरा वर्षांची झाल्यानंतर तुम्हीही पीपीएफ अकांऊट काढू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळतच्या बॅंकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पीपीएफ अकांऊट ओपनिंग फॉर्म आणवा लागेल. त्यानंतर आवश्यक ते डॉक्यूमेंट्स तुम्ही याद्वारे भरू शकता. फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक त्या डॉक्यूमेंट्ससोबत तुम्ही हा फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमची नोंदणी नोंद झाल्यानंतर तुमचे पीपीएफ अकांऊट ओपन होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com