New GST Update Related to Invoice: मोठ्या व्यावसायिक कंपन्यांसाठी जीएसटी (GST News) संदर्भात एक नवीन अपडेट आली आहे.
1 नोव्हेंबरपासून, मोठ्या कंपन्यांना 30 दिवसांच्या आत पोर्टलवर वस्तू आणि सेवा करा (GST) शी संबंधित रिसीट अपलोड करावी लागेल. ही तरतूद 100 कोटी किंवा त्याहून अधिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना लागू होईल.
जीएसटी ई-रिसीप्ट पोर्टलचे संचालन करणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) जीएसटी प्राधिकरणाच्या या निर्णयाची माहिती दिली आहे.
त्यानुसार, प्राधिकरणाने जारी केल्यापासून 30 दिवसांच्या आत रिसीट पोर्टलवर अपलोड करण्यास सांगितले आहे.
ही अंतिम मुदत 100 कोटी किंवा त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या करदात्यांना लागू असेल. ही प्रणाली 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू होणार आहे.
एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणाले की, जर ही प्रणाली सुरळीतपणे अंमलात आणली गेली, तर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) नंतर सर्व जीएसटी करदात्यांना लागू करु शकेल.
केंद्र सरकारने (Central Government) 1 सप्टेंबरपासून मेरा बिल, मेरा अधिकार योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार दरमहा 800 लोकांची निवड करेल. हे ते 800 लोक असतील जे दर महिन्याला त्यांचे GST बिल ऑनलाइन अपलोड करतील.
या 800 लोकांना 10,000 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचवेळी, अशा 10 लोकांची निवड केली जाईल, ज्यांना सरकार 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देईल. योजनेंतर्गत, त्रैमासिक आधारावर 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. हे बक्षीस दोन लोकांना दिले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.