Bengaluru Employee Tweet: "निम्मा पगार सरकारला का ? " इन्कम टॅक्स वरुन कर्मचारी भडकला, ट्विटरवर नव्या वादाला सुरवात

Bengaluru Employee Income Tax: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच सांगितले की, मोदी सरकारने मध्यमवर्गीयांना अनेक कर सवलती दिल्या आहेत.
Income Tax
Income TaxDainik Gomantak
Published on
Updated on

Income Tax Viral Tweet: प्राप्तिकरातून सूट देण्याबाबत सरकार अनेकवेळा मोठे निर्णय घेत असते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच सांगितले की, मोदी सरकारने मध्यमवर्गीयांना अनेक कर सवलती दिल्या आहेत. या अंतर्गत दरवर्षी 7.27 लाख रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.

दुसरीकडे, अशा वेळी जेव्हा लोक आयकर रिटर्न फाईल करण्यात व्यस्त आहेत, तेव्हा फ्लिपकार्टमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने उत्पन्न आणि खर्च या दोन्हींवर कर भरण्याबाबत आपली निराशा ट्विटरवरुन व्यक्त केली आहे.

"आज मी 5,000 रुपये कमावले, यावर मला 30 टक्के कर भरावा लागणार होता. तर उरलेल्या पैशातून मी कॅफिनयुक्त पेये घेण्याचा विचार केला आणि त्यावर 28 टक्के कर भरावा लागला," असे संचित गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले!

त्यांनी पुढे लिहिले की, "मला समजले की, मी माझ्या उत्पन्नातील (Income) 50 टक्के सरकारला देण्यासाठी दिवसाचे 12 तास काम करत होतो."

Income Tax
ITR Filing: मोदी सरकारकडून दिलासा, Income Tax वर मिळाली मोठी सूट; यापूर्वी कधीही...

दरम्यान, फॉलो-अप ट्विटमध्ये गोयल म्हणाले की, 20 रुपयांच्या चॉकलेट बारवरही सरकारला 27.5 टक्के कर मिळतो.

दुसरीकडे, 5 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेलेले गोयल यांचे सुरुवातीचे ट्विट अनेक ट्विटर यूजर्संनी लाइक केले. सतीश रेड्डी या टविटर यूजर्सने लिहिले की, ''जेव्हा तुम्हाला कळते की, कर महसुलाचा मोठा हिस्सा पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी सरकारी कर्मचार्‍यांच्या (Employees) पगारात, निवृत्तीवेतनात आणि अनावश्यक खर्चात जातो तेव्हा प्रचंड संताप होतो."

Income Tax
Income Tax Return: ITR भरणाऱ्यांना मिळणार एवढ्या लाखांची सूट, अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा

आणखी एक ट्विटर यूजर्स रमन (@Ramanaeapgenco) यांनी लिहिले की, "जर तुम्हाला कसिनो खेळायचा असेल तर हे आणखी वाईट आहे." यावर गोयल म्हणाले की, "मला माहित आहे. संपूर्ण जोखीम माझी आहे, तरीही मला कर भरावा लागेल. एकतर सरकारने माझ्यासोबत जोखीम घ्यावी. मी जिंकलो तर मला कर भरावा लागेल, जर मी हरलो तर तो पूर्णपणे हा माझा पराभव असेल."

दुसरीकडे, आणखी एकाने लिहिले की, “हे आज मध्यमवर्गीयांचे दुःख आहे. तुम्ही कार खरेदी केल्यास केवळ 28 टक्के जीएसटी नाही तर 22 टक्के सेसही भरावा लागेल. तसेच 10 टक्के रोड टॅक्स. अंदाजे 150 टक्के फ्यूयल टॅक्स आणि 2.5 रुपये प्रति किमी टोल टॅक्स.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com