Adani Power ची अक्षय ऊर्जेसाठी 1.47 लाख कोटींची गुंतवणूक

कंपनी (Adani Power) येत्या चार वर्षांत अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता तिप्पट करण्याचा आणि ग्रीन हायड्रोजन उत्पादनाकडे धाव घेण्याच्या तयारीत आहे.
Adani Power will invest 1.47 lakh cr rupees in renewable energy
Adani Power will invest 1.47 lakh cr rupees in renewable energyDainik Gomantak

उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांची कंपनी (Adani Power) पुढील 10 वर्षात अक्षय ऊर्जा (Renewable energy) निर्मिती आणि ऊर्जा घटकांच्या निर्मितीवर 20 अब्ज डॉलर म्हणजेच 1.47 लाख कोटी रुपये खर्च करेल. त्याचबरोबर कंपनी जगातील सर्वात स्वस्त हरित इलेक्ट्रॉन(Green electron)ऊर्जा देखील बनवेल.जेपी मॉर्गन इंडिया इन्व्हेस्टर समिटमध्ये (JP Morgan India investor summit) बोलताना अदानी म्हणाले की, कंपनी येत्या चार वर्षांत अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता तिप्पट करण्याचा आणि ग्रीन हायड्रोजन उत्पादनाकडे धाव घेण्याच्या तयारीत आहे.(Adani Power will invest 1.47 lakh cr rupees in renewable energy)

याव्यतिरिक्त, नूतनीकरणीय ऊर्जेवर सर्व डेटा केंद्रे चालवण्याची, 2025 पर्यंत त्याच्या बंदरांचे कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याची आणि 2025 पर्यंत हरित तंत्रज्ञानामध्ये भांडवली खर्चाच्या 75 टक्क्यांहून अधिक खर्च करण्याची देखील कंपनीची योजना आहे.असे अडाणी यांनी या समिटमध्ये सांगितले आहे.

Adani Power will invest 1.47 lakh cr rupees in renewable energy
सरकारने अमोनियम नायट्रेटची चोरी रोखण्यासाठी नियमात केला बदल

ते म्हणाले की, नवीकरणीय ऊर्जा निर्मिती, घटक उत्पादन, प्रसारण आणि वितरण क्षेत्रात 20 अब्ज डॉलर गुंतवले जातील. अदानी समूहाची एकात्मिक मूल्य साखळी, आमची क्षमता आणि अनुभव यामुळे आम्ही जगातील सर्वात स्वस्त ग्रीन इलेक्ट्रॉन उत्पादक बनण्याच्या मार्गावर आहोत.

कंपनीची सध्याची उत्पादन क्षमता 4,920 मेगावॅट इतकी

कंपनीकडे सध्या 4,920 मेगावॅट कार्यरत अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता आहे, तर 5,124 मेगावॅट उत्पादना साठीच्या प्रकल्पाची बांधणी सुरू आहे. याव्यतिरिक्त, 9,750 मेगावॅटचे प्रकल्प प्रस्तावित आहेत आणि 4500 मेगावॅट क्षमतेचे करार सुरक्षित करण्याचा प्रयत्न देखील चालू आहे.

या घोषणेमुळे अदानींनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. एका आठवड्यापूर्वी, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांनी स्वच्छ ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनावर तीन वर्षात 10 अब्ज डॉलर्स (75,000 कोटी रुपये) खर्च करण्याची घोषणा केली होती.पेट्रोकेमिकल जायंट अंबानी यांनी 24 जून रोजी अक्षय ऊर्जेमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केल्यांनतर देशातील दुसरे श्रीमंत व्यक्ती अदानी यांच्याशी त्यांची थेट स्पर्धा म्हणून पाहिले जात आहे.

अदानी समूहाची अनेक वर्षांपासून अक्षय ऊर्जा क्षेत्रात मजबूत उपस्थिती आहे. या महिन्यात अंबानी म्हणाले होते की, एक डॉलर प्रति किलोग्राम दराने अक्षय ऊर्जेपासून हायड्रोजन बनवता येते, ज्यामुळे कार्बन उत्सर्जित होत नाही. हे उद्योग आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात इंधन म्हणून वापरले जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com