भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी फिनटेक बाजारपेठ आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत के कराड म्हणाले की, सरकारकडून डिजिटलायझेशनवर जी वेगाने पावले उचलली जात आहेत त्याचा देशातील फिनटेकक्षेत्रावरही सकारात्मक परिणाम होईल आणि 2025 पर्यंत त्याचा आकार मूल्याच्या दृष्टीने तीन पटीने वाढेल.आणि तोपर्यंत देशाचा फिनटेक बाजारपेठ 6.20. लाख कोटी रुपये इतका मोठा असेल. (6.20 lakh crore investment will be possible in Fintech market)
अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी बुधवारी उद्योग संस्था SHMOच्या ऑनलाईन कार्यक्रमात हे मत मांडले आहे ,तसेच सरकारने घेतलेल्या विविध पावलांमुळे फिनटेक क्षेत्र वेगाने वाढत आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये फिनटेकचा अवलंब करण्यात भारत आघाडीवर आहे. देशात फिनटेकच्या स्वीकृतीचा दर मार्च 2020 पर्यंत 87 टक्के होता, जो जागतिक सरासरी 64 टक्क्यांच्या तुलनेत होता. 2019 मध्ये देशांतर्गत फिनटेक बाजार 1.92 लाख कोटी रुपयांचे होते.
डिजिटल व्यवहारांमध्ये भारत प्रथम क्रमांकावर
कराड यांनी निदर्शनास आणून दिले की भारत हे कुशल कामगारांमुळे फिनटेकच्या विकासासाठी एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे. तसेच डिजिटल व्यवहारांमध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे. भारताने एकूण डिजिटल व्यवहारांचा 25 अब्जांचा टप्पा पार केला असल्याचेही राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले की, भारत प्रधानमंत्री जन धन योजना, डिजीलॉकर आणि यूपीआय इत्यादी अंतर्गत बँक खात्यांच्या प्रवेशाद्वारे फिनटेकच्या विकासासाठी एक अद्भुत प्लॅटफॉर्म देते .
अर्थ राज्यमंत्री म्हणाले की, सरकार एक मजबूत आणि सुरक्षित तंत्रज्ञान परिसंस्था विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला खात्री आहे की सार्वजनिक-खाजगी भागीदारीने आर्थिक समावेशन वाढवेल. आधुनिक भारतीय डिजिटल सेवा सर्व भारतीयांना उपलब्ध होतील.आधुनिक तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचे सर्वात मजबूत माध्यम आहे यावर त्यांनी भर दिला आहे . साथीच्या काळात कोट्यवधी रुपये एका बटणाच्या एका क्लिकवर खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेले. साथीच्या काळात गरीबांच्या खात्यात रोख हस्तांतरणात आर्थिक समावेशनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
2020-21 मध्ये 1.55 लाखांहून अधिक नवीन कंपन्यांनी नोंदणी केली आहे
2020-21 दरम्यान देशातील नवीन कंपन्यांची नोंदणी 26 टक्क्यांनी वाढून 1,55,377 इतकी झाली आहे . 2019-20 मध्ये एकूण 1,22,721 कंपन्यांची नोंदणी झाली. रुबिक्स डेटा सायन्सेसच्या अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षाची सुरुवात कंपन्यांसाठी विक्रमी कमी नोंदणीसह झाली, तर गेल्या तिमाहीत नोंदणीची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती.
मार्च, 2021 मध्ये 17,324 च्या तुलनेत एप्रिल, 2020 मध्ये एकूण 3,209 कंपन्यांची नोंदणी झाली आहे . अहवालात म्हटले आहे की महामारीची दुसरी लाट असूनही 2021-22 दरम्यान नवीन कंपन्यांच्या नोंदणीची गती कायम राहण्याची अपेक्षा आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.